Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Live Updates : गोवा हवामान विभागाकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मुसळधार नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी असला तरीही संततधार सुरुच असल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेलीच आहे. पावसामुळे गोव्यातील वाहतुकीवरही परिणाम झाला असून ती धिम्या गतीने सुरु आहे.

  • गोवा हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मुसळधार नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना.

Dona Paula
Dona Paula
  • राज्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसाची बॅटींग सुरू आहे. नेऋत्य मौसमी वाऱ्याचा वेग वाढत असून अरबी समुद्रही सध्या खवळलेला आहे. या समुद्राच्या लाटा पश्‍चिम किनाऱ्यावर येऊन धडकतात. दोना पावला येथील जेटीवर समुद्राच्या लाटा धडकू लागल्या आहेत. परंतु मागील सातआठ वर्षांपासून जेटी नुतकरणासाठी बंद राहिली. यापूर्वी या जेटींवर लाटांचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसायची. आता मात्र फक्त लाटांचे तुषार जेटीवर उडताना दिसतात.

गोव्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री सावर्डेजवळ रेल्वे रुळावर झाड कोसळले आहे. त्यामुळे वास्को-कुळे रेल्वेमार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवून वाट मोकळी करून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT