Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: मास्क घालताय ना? दिवसभरात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ

गेल्या 24 तासांत देशात 3,641 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, 1,800 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्यात गेल्या आठवड्यापासून नव्याने वाढ होणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी (दि.04) दिवसभरात राज्यात 169 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, 87 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील सक्रिय रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात 1,175 नमुने तपासण्यात आले, त्यापैकी 169 नमुने सकारात्मक आले आहेत. राज्यात आजवर 02 लाख 60 हजार 403 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 02 लाख 55 हजार 594 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट 98.15 टक्के एवढा आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकही कोरोनाबाधित रूग्ण दगावलेला नाही. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यात 4014 रूग्ण दगावले आहेत. (Goa Corona Update)

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 20,219

देशातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 3,641 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, 1,800 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या वाढून 20,219 एवढी झाली आहे.

देशाचा रिकव्हरी रेट 98.76 टक्के एवढा आहे. देशातील विविध राज्यात नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ञांनी काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT