Goa Environment| Dainik Gomantak
गोवा

Old Borim bridge: बोरीचे अखेरचे अवशेष हटविले, मुक्ती लढ्याची आठवण पर्यटकांना पाहता येणार

गोवा मुक्त करण्यासाठीं भारतीय सेना येणार याची चाहूल लागल्यावर पोर्तुगीजांनी गोवा सोडून जाताना स्फोटकांचा वापर करून हा बोरीचा पुल उडवून लावला होता.

दैनिक गोमन्तक

Old Borim bridge: बोरी येथील जुन्या पोर्तुगीजकालीन पुलाचे शेवटचे अवशेष काल हटविण्यात आले. हे अवशेष पर्यटन खात्याकडे सुपूर्द करण्यात येणार असून गोवा मुक्ती लढ्याची आठवण म्हणून ते पर्यटकाना दाखविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यानी सांगितले.

गोवा मुक्त करण्यासाठीं भारतीय सेना येणार याची चाहूल लागल्यावर पोर्तुगीजांनी गोवा सोडून जाताना स्फोटकांचा वापर करून हा बोरीचा पुल उडवून लावला होता. जेणेकरून भारतीय सेनेला गोव्यात प्रवेश करणे कठीण होणार पण भारतीय सेनेने या जागेवर बेली पूल बांधून पोर्तुगीज सैन्याचे मनसुबे धुळीस लावले होते.

याची माहिती गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना मिळावी यासाठी हे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर हा पुल कमकुवत झाल्याने नवीन पुल बांधला होता.

पण या जुन्या पुलाचा सांगाडा नदीत तसाच होता. या नदीतून होणाऱ्या बार्ज वाहतुकीला तो धोकादायक ठरत असल्याने नंतर तो पाडण्याचा निर्णय घेतला होता.

पण त्याचे काही अवशेष अजून बाकी होते. ते सर्व हटविण्यात आले आहेत. नदीच्या पात्रात खाली राहिलेले अवशेषही काढून घेण्यात आले आहेत, अशी माहिती काब्राल यांनी दिली.

हा पूल कमकुवत झाल्याने नवीन पूल बांधला होता. पण या जुन्या पुलाचा सांगाडा नदीत तसाच होता. या नदीतून होणाऱ्या बार्ज वाहतुकीला तो धोकादायक ठरत असल्याने नंतर तो पाडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचे काही अवशेष अजून बाकी होते. ते सर्व हटविले आहेत. - नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT