Malpe Pernem NH66 Highway Dainik Gomantak
गोवा

Malpe Pernem: दरड कोसळणार नाही कशावरून? मालपे-पेडणे महामार्गाबाबत नागरिकांच्या मनात भीती कायम

Malpe Pernem NH66: राष्ट्रीय महामार्ग ६६ तयार करत असताना मालपे ते न्हयबाग पर्यंतचा एक बायपास रस्ता केला होता. हा रस्ता करत असताना या रस्त्याच्या बाजूला दरड होती.

Sameer Panditrao

मोरजी: मालपे पेडणे राष्ट्रीय महामार्ग ६६ बायपास रस्त्यावरील दरड आणि संरक्षक भिंतीला धोका नाही, असे लोकप्रतिनिधी, अभियंते म्हणतात. परंतु वाहन चालक, नागरिकांच्या मनात कायमची भीती आहे.

ही भीती दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने संरक्षक भिंत आणि दरड कोसळणार नाही, यादृष्टीनेउपाययोजना करावी, अशी मागणी लेखी स्वरूपात मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी पेडणे सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाला निवेदन देताना केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ६६ तयार करत असताना मालपे ते न्हयबाग पर्यंतचा एक बायपास रस्ता केला होता. हा रस्ता करत असताना या रस्त्याच्या बाजूला जी दरड होती ती दरड मागच्या दोन वेळा पावसात कोसळल्याने हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद होता.

त्यानंतर कंत्राटदाराने संरक्षण भिंत उभारली. परंतु ही भिंत सुरक्षित आहे की नाही याबद्दल आता लोक संशय व्यक्त करत आहेत, त्याच अनुषंगाने मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी बांधकाम खात्याला निवेदन देऊन या बांधकाम दुरुस्ती व उपाययोजना करण्याची मागणी केली.

या रस्त्याविषयी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी २८ मे रोजी या संरक्षण भिंतीची पाहणी केली. त्यावेळी उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक उपस्थित होते.

मालपे-पेडणे राष्ट्रीय महामार्ग ६६ बायपासच्या भयानक दुरवस्थेकडे आपण लक्ष वेधत आहे, जिथे दृश्यमान भेगा आणि कमकुवत संरक्षक भिंत यामुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक रहिवाशांत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. पावसाळा असताना, दरड कोसळण्याची भीती वाढत आहे.
राजन कोरगावकर, मिशन फॉर लोकल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Chimbel: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी; चिंबलवासीयांचा विरोधच

Goa Jail: कैद्यांच्या जेवणावर होणार 90 ऐवजी 123 रुपये खर्च! दरवाढ लागू; पोषणमान, महागाईचा विचार करून निर्णय

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

SCROLL FOR NEXT