Goa Landslide Dainik Gomantak
गोवा

Landslide In Goa: पाजीफोंड येथे टेकडीच्या पायथ्याशी भूस्खलन; दोन इमारतींना धोका

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव/वाळपई : वायनाड येथे भूस्खलनामुळे झालेल्या महाभयंकर विध्वंसाच्या आठवणी ताज्या असतानाच आता राज्यातही भूस्खलन आणि रस्ते वाहून जाण्याचे गंभीर प्रकार घडल्याने घबराट निर्माण झाली आहे. त्यातच हवामान खात्याच्या वेधशाळेने उद्या (रविवारी) जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज (शनिवारी) सायंकाळी पाजीफोंड-मडगाव येथील एका टेकडीच्या पायथ्याशी भूस्खलन झाल्याने लोकांना भीतीचे कापरे भरले. ज्या जागी ही माती कोसळली, तिथे लागूनच दोन बहुमजली इमारती असून या इमारतींना त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून एका इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या फ्लॅटमधील एका कुटुंबाचे दुसरीकडे स्थलांतर केले आहे.

दुसऱ्या घटनेत होंडा ते वाळपई मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर श्रीराम कॉलनीत जाणारा रस्ता धुव्वाधार पावसामुळे वाहून गेला. या रस्त्यावरील छोट्या पुलाच्या बाजूची चिऱ्याची भिंत कोसळली असून येथून रहदारी करणे धोक्याचे झाले आहे.

पावसाच्या पाण्याने खचला रस्ता

पाजीफोंड येथील ‘सपना व्हॅली’ या प्रकल्पाच्या दोन इमारती असून त्यातील एक इमारत तीनमजली, तर दुसरी इमारत सहामजली आहे. या दोन्ही इमारतींच्या बाजूला उतरणीचा रस्ता असून पावसाच्या पाण्याने हा रस्ताच खचल्याने या इमारतींना धोका निर्माण झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी गिल सोझा यांनी दिली.

...तर इमारतीची हानी शक्य

भूस्खलनामुळे आणखी माती वाहून गेली तर इमारतीच्या पायाला धोका पोहोचू शकतो, अशी माहिती गिल सोझा यांनी दिली. सध्या ज्या ठिकाणी माती कोसळली आहे, तिथे पावसाचे पाणी झिरपू नये यासाठी टार्पोलीन घालून ती जागा झाकली आहे. मात्र, मुसळधार पाऊस पडल्यास स्थिती आटोक्यात आणणे कठीण होईल, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT