Goa Landslide  Dainik Gomantak
गोवा

Landslide In Goa: पुन्हा दरड कोसळून सहा सदनिकांची हानी; मार्ले-बोर्डा येथील घटना

गोमन्तक डिजिटल टीम

दोन दिवसांपूर्वी मार्ले-बोर्डा येथे डोंगराच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या रायेश चेंबर या इमारतीवर दरड कोसळून चार सदनिकांची हानी झाली होती. गुरुवारी पुन्‍हा एकदा याच इमारतीवर दरड कोसळून आणखी सहा सदनिकांची हानी झाली.

डोंगराची माती कोसळणे चालूच असल्‍याने या इमारतीच्‍या रहिवाशांवर भीतीचे सावट पसरले आहे. मंगळवारी सकाळी ८.३० च्‍या दरम्‍यान या डोंगराची दरड कोसळून माती या इमारतीच्‍या बाजूला असलेल्‍या एका संरक्षक भिंतीवर पडली होती. या मातीच्‍या वजनाने संरक्षक भिंत इमारतीवर कोसळून चार फ्‍लॅटस्‌ची हानी झाली होती.

आज पहाटे ४.३० च्‍या सुमारास त्‍याच इमारतीजवळ पुन्‍हा एकदा दरड कोसळून त्‍या संरक्षक भिंतीचा राहिलेला भाग इमारतीवर कोसळल्‍याने आणखी सहा फ्‍लॅटस्‌ची हानी झाली, अशी माहिती या इमारतीच्‍या सोसायटीचे अध्‍यक्ष रामदास कच्‍ची यांनी दिली.

इमारतीवर माती कोसळल्यानंतर त्‍वरित अग्निशमन दलाला त्‍या ठिकाणी बोलावण्‍यात आले. अग्निशमन दलाचे अधिकारी गील सौझा यांनी परिस्‍थितीचा आढावा घेतला. मातीचा ढिगारा असूनही इमारतीच्‍याच फ्‍लॅटस्‌वर असल्‍याने नेमकी किती हानी झाली आहे हे अजून कळलेले नाही.

कित्‍येक इमारती धोक्‍याच्‍या छायेत; सावियो कुतिन्हो

मोर्ले-बोर्डा येथे रायेश चेंबर इमारतीवर दरड कोसळल्‍याने झालेली दुर्घटना हा फक्‍त एक नमुना आहे. डोंगराच्‍या पायथ्‍याशी बांधलेल्‍या मडगावातील कित्‍येक इमारती धोक्‍याच्‍या छायेत आहेत. डोंगराची माती अडवून ठेवण्‍यासाठी ज्‍या संरक्षित भिंती बांधल्‍या आहेत, त्‍या आरसीसी नसून फक्‍त चिरे आणि सिमेंटचा वापर करून बांधल्‍याने पावसात डोंगराची माती खचून खाली आल्‍यास मातीचे वजन या संरक्षक भिंती पेलून घेऊ शकणार नाहीत. त्‍यामुळे असे प्रकार झाल्‍यास भविष्‍यात अनर्थ घडू शकतो, अशी प्रतिक्रिया मडगावचे माजी नगराध्‍यक्ष सावियो कुतिन्‍हो यांनी ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या साश्‍‍टीकार या कार्यक्रमात बोलताना व्‍यक्‍त केली. गोमन्‍तकचे ब्‍युरी चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी घेतलेली ही मुलाखत ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या यू-ट्यूब, फेसबुक आणि इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

...तर आणखी हानी

एक मोठे जांभळीचे झाड या इमारतीवर कलल्‍याने भीतीचे वातावरण तयार झाले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. हा भला मोठा वृक्ष असल्‍यामुळे तो कापून काढल्‍यास इमारतीवर कोसळून इमारतीची आणखी हानी होऊ शकते. त्‍यामुळे क्रेनच्‍या साहाय्याने तो हटवावा लागेल पण ही जागा डोंगरावर असल्‍याने तिथे क्रेन नेणे जिकिरीचे ठरले आहे, असे अग्निशमन दलाचे अधिकारी गील सौझा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT