Salaulim Dam Dainik Gomantak
गोवा

Salaulim Dam: धरणासाठी जागा घेतली, आमच्या पुनर्वसनाचं काय? साळावली प्रकल्पग्रस्तांचा टाहो

47 वर्षांपासून नागरिकांची सरकारकडे मागणी

Kavya Powar

Salaulim Dam: साळावली धरण बांधणीवेळी कुर्डी तसेच बाजूच्या गावातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. त्याबदल्यात सरकारकडून त्यांना प्रत्येक घरासाठी प्रत्येकी एक नोकरी, शेतीव्यवसायाला दहा हजार चौरस मीटर जमीन तसेच घर बांधणीसाठी चारशे चौरस जमीन देण्याचे जाहिर केले होते.

मात्र याबाबत आता नागरिक आक्रमक झाले आहेत. कारण त्यातील 72 लोकांना त्याचा लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मागील 47 वर्षे ते लोक सरकारकडे मागणी करत आहेत. सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

इथे आजवर झालेल्या आमदारांनी काहीच पावले उचलली नसल्याने आजवर आमचे काम झाले नाही. लोकप्रतिनिधी फक्त प्रत्येक निवडणुकीवेळी आश्वासन देऊन जातात पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत.

धरणासाठी जागा गेलेल्या कुटुंबांमधील अनेक वडीलधारी मंडळी मृत्यू पावली असून आता तरुण पिढीला रस्तावर येण्याची वेळ आली आहे, म्हणून पुन्हा एकदा आम्ही याबाबत आवाज उठवत आहोत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

उपस्थित असलेल्या ग्रामस्थांपैकी एक तरुण म्हणाला की, जलसंपदा विभागात याबाबत विचारले असता ते सांगतात की यासाठी तुमच्या भागातील आमदारांनी लक्ष घालणे गरजेचे आहे, यामध्ये जलसंपदा विभाग काहीच करू शकत नाही. मागील अनेक वर्षांपासून असेच चालले असून आमच्यावर हा खूप मोठा अन्याय झाला आहे.

सरकारने याबाबत त्वरित पावले उचलावीत अन्यथा गप्प बसणार नाही असे मत संतप्त जमावाने व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT