Goa Flight Rate: लॉंग विकेंडच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येण्यासाठी विमान भाडे झाले दुप्पट; बसप्रवासही महागला

गोव्यात येणाऱ्या फ्लाइट तिकिटांची किंमत त्यांच्या सामान्य किंमतीपेक्षा पाचपटीने वाढली आहे
Goa Flight Rate
Goa Flight Rate Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Flight Rate Increased: सुट्टी किंवा लॉंग विकेंड असेल तर अनेकजण गोव्यात वेळ घालवणे पसंत करतात. आता स्वातंत्र्यदिनाचा मोठा वीकेंड जवळ येत असताना गोव्यात येणाऱ्या फ्लाइट तिकिटांची किंमत त्यांच्या सामान्य किंमतीपेक्षा पाचपटीने वाढली आहे.

जर तुम्हाला बेंगळूर ते गोवा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तिकीटासाठी तब्बल 9,800 खर्च करायची तयारी ठेवायला हवी. जो प्रवास आधी 2,200 रुपयात व्हायचा त्याला आता तुम्हाला 9800 रुपये मोजावे लागणार आहेत.

Goa Flight Rate
Vasco Crime: परेरा यांना अटक न झाल्यास गोवा बंद करु- शिवप्रेमींचा इशारा

फक्त बेंगळूर ते गोवाच नाही तर इतर ठिकाणच्या उड्डाणांचेही दर वाढले आहेत. पुण्याहून 11 ऑगस्टच्या फ्लाइट तिकिटाची किंमत 4,500 रुपयांच्या नेहमीच्या किमतीच्या तुलनेत 13,300 रुपये झाली आहे.

चेन्नईतून गोव्यात येण्यासाठी आधी विमान प्रवाशांना 4000 मोजावे लागत होते,पण 11 ऑगस्टपासून त्याची किंमत 9000 झाली आहे. रिटर्न तिकीट तर याहून महाग झाले असून चेन्नईला परतण्यासाठी 9200 रुपये मोजावे लागणार आहेत.

दिल्लीतून उड्डाण करणाऱ्यांना आधी 4600 रुपये मोजावे लागायचे तर आता प्रति तिकिट 9500 रुपये द्यावे लागणार आहेत. 15 ऑगस्टला दिल्लीला परतीचे भाडे इथेही जास्त असून ते 11,000 रुपयांवर पोहोचले आहे.

हैदराबादहून विमान प्रवास करणार्‍यांसाठीही अशीच परिस्थिती आहे, आता एका तिकिटाची किंमत आता 7,750 रुपये झाली असून आधी साधारणपणे 3,700 रुपये प्रती तिकीटाची किंमत होती.

तर दुसरीकडे, मुंबईच्या बाबतीत सारखीच परिस्थिती असून विमान भाडे आता 5,800 रुपयांवर पोहोचले आहे. याआधी साधारण 2,600 रुपयांत मुंबई-गोवा प्रवास व्हायचा. एवढेच नाही तर नियमित विमान भाड्याच्या तुलनेत मुंबई ते गोवा बस प्रवासही महागला आहे. 11 ऑगस्टला स्लीपर एसी सीटसाठी 4,000 रु. मोजावे लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com