Land grab case SIT legal advice panaji Dainik Gomantak
गोवा

Fraud News: सुएलांकडून तक्रार मागे

Fraud News: जमीन हडप प्रकरण : एसआयटी घेणार कायदेशीर सल्ला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Fraud News: मूळ गोमंतकीय असलेल्या युकेच्या गृह सचिव सुएला ब्रावेरमन यांच्या आसगाव येथील वडिलोपार्जित जमीन मालमत्तेसंदर्भात तक्रार नोंदवून केलेल्या चौकशीत त्यांची जमीन हडप करण्यात आलेली नाही. त्यांच्या या मालमत्तेसंदर्भातचा कुटुंबातील अंतर्गत प्रश्‍न आहे. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने या मालमत्तेसंदर्भात बनावट दस्तावेज तयार करून हडप केलेली नाही.

तक्रारदार ब्रावेरमन यांनीही तक्रार मागे घेत असल्याचे कळविले आहे. यासंदर्भात कायदा तज्ज्ञांचे मत घेऊन हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एसआयटीचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

ब्रिटनच्या गृह सचिव सुएला ब्रावेरमन यांच्या कुटुंबीयांनी ई-मेलद्वारे एसआयटीकडे तक्रार दाखल केली होती तशीच ई-मेल पाठवून त्यांच्या आईने ही तक्रार मागे घ्यायची आहे व त्यांच्या कुटुंबामधील जमिनीसंदर्भात असलेला प्रश्‍न समझोत्याने सोडवायचा आहे, असे त्यात म्हटले आहे. एसआयटीने या तक्रारीसंदर्भात केलेल्या चौकशीत त्यांची जमीन हडप केल्याचे किंवा बोगस दस्तावेज तयार केल्याचे आढळून आलेले नाही.

जमीन हडप करण्यासाठी बनावट दस्तावेज तयार केलेल्या प्रकरणांचा तपास एसआयटीकडून केला जात आहे. त्यामुळे ही तक्रार या तपासकामाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे. एकदा तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांना ती स्वतःहून बंद करता येत नाही तर ती बंद करण्यामागील कारणे न्यायालयाला देऊन त्यासाठी अर्ज करावा लागतो. न्यायालयाने परवानगी दिलीच तर ती बंद करता येते, असे वाल्सन यांनी सांगितले.

गेल्या सप्टेंबर २०२२ मध्ये ब्रावेरमन यांचे वडील क्रिस्टले फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री व पोलिस महासंचालकांशी संपर्क साधून त्यांची मालमत्ता अज्ञात व्यक्तीने हडप केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आलेली मालमत्ता देण्यात आलेली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

क्रिस्टले यांचे बंधू आयरिश फर्नांडिस यांनी वडिलोपार्जित मालमत्ता विकली होती. क्रिस्टले यांनी मालमत्तेची पावर ऑफ ॲटर्नी बंधू आयरिश याला दिली होती. त्याने ११ एप्रिल २०२२ रोजी दोन मालमत्तेची खरेदीपत्रे केली होती. दोन महिन्यांनी क्रिस्टले यांनी दिलेली पावर ऑफ ॲटर्नी नोटीस देऊन रद्द केली होती व न्यायालयात नागरी खटला दाखल केला होता.

कायद्यानुसार मालमत्तेचे वाटप

एसआयटीकडे ब्रावेरमन यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भातची चौकशी सुरू असताना त्यांच्या आईने सरकारला पत्र पाठवून तिचा पती क्रिस्टले व त्यांचा भाऊ आयरिश या दोघांना हे प्रकरण समझोत्याने निपटण्यास द्यावे, अशी विनंती केली होती. १९९१ साली मालमत्तेसंदर्भात झालेल्या इन्व्हेन्टरीनुसार किस्टले यांच्या कुटुंबियांच्या सदस्यांना कायद्यानुसार त्यांचा वाट्याला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT