Goa Land Dispute Case Dainik Gomantak
गोवा

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Land Dispute Violence Goa News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वादाच्या घटना सातत्याने समोर येतायेत. अशाच प्रकारची घटना चिवार-हणजूण येथून समोर आली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वादाच्या घटना सातत्याने समोर येतायेत. अशाच प्रकारची घटना चिवार-हणजूण येथून समोर आली आहे. जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिगंबर साळकर आणि अखिल टेक्केकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जमिनीच्या वादातून मेव्हिल्टन थिओडोर यांच्या खूनाचा प्रयत्न या दोघांनी केला. दरम्यान, थिओडोर यांच्या तक्रारीवरुन खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा हणजूण पोलिसांकडून आरोपींविरोधात दाखल करण्यात आला आहे. बाऊन्सरकडून केलेल्या हल्ल्यात मेव्हिल्टन आणि त्यांचे वडील जखमी झाले.

प्रकरण नेमकं काय?

आसागाव येथील मारिया थिओडोर नावाच्या महिलेने दावा केला की, जमिनीच्या वादातून तिचा पती आणि तिच्या मुलावर 20 बाऊन्सर्संनी हल्ला केला. संबंधित जमीन तिच्या आजीची आहे आणि ती कायदेशीर वारस आहे. मात्र असे असूनही तिला जबरदस्तीने बाहेर काढण्यासाठी 20 बाउन्सर तिच्या घरी आले. तिला जबरदस्तीने बाहेर काढत असताना तिचा मुलगा आणि पती जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे पोलिसांकडून दावा करण्यात आला आहे की, या घटनेत कोणत्याही बाऊन्सरचा सहभाग नव्हता. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.

जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाटपाल-काणकोण येथून जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मृतकाचे नाव संतोष रिवणकर असे होते. संतोष रिवणकर आणि रोहन नाईक यांच्यात झालेल्या बाचाबाचीत गंभीर मार लागल्‍याने तो खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे निश्‍चित कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे काणकोणचे पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी सांगितले आहे. पोलिसांनी रोहन नाईक याला अटक केली आहे.

जमिनीचा वाद

संतोष रिवणकर आणि सागर मोरजकर यांच्यात जमिनीवरुन वाद सुरु होता. या दोघांची पोट्टे येथे वीस कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या जमिनीत घरे आहेत. मात्र सागर मोरजकर याला तीन क्रमांकाचा जमिनीचा प्लॉट दिला असताना त्याने प्लॉट क्रमांक पाचवर पक्के बांधकाम करण्यास सुरूवात केल्यानंतर त्याच्याविरोधात संतोष रिवणकर व भाऊ सचिन रिवणकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम रोखण्‍याचा आदेश दिला. तरीसुद्धा त्याने काम सुरुच ठेवले, अशी माहिती स्थानिक पंच सतीश पैंगीणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

SCROLL FOR NEXT