Oppose to mega project Canva
गोवा

Ekoshi News: '१५ दिवसांत झोन बदल मागे घ्या नाहीतर..'; मेगा प्रकल्पाविरुद्ध एकोशीवासीय संतप्त

Ekoshi: गावातील मेगा प्रकल्पाला विरोध करत रविवारी धीरेंद्र फडते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आंदोलन केले

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा:आपल्या गावातील जमिनीचे रूपांतरण झाल्यामुळे संतप्त एकोशी रहिवाशांनी आज रविवारी त्यांच्या गावातील एका मेगा प्रकल्पाला विरोध करत गावात विद्ध्वंस होऊ देणार नाही, असे सांगून आंदोलनाचा इशारा दिला. प्रसंगी न्यायालयात जाण्याची धमकीही दिली. येत्या १५ दिवसांत झोन बदल मागे न घेतल्यास आम्ही शांत बसणार नाही आणि आंदोलन करू, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला.

गावातील मेगा प्रकल्पाला विरोध करत रविवारी धीरेंद्र फडते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आंदोलन केले. एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला टेकड्या असलेले एकोशी गाव हे समुद्रकिनारी असलेले गाव संरक्षित करण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. नो डेव्हलपमेंट झोनमध्ये वनक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदा रस्त्याच्या बांधकामाविरोधात ग्रामस्थ एकजुटीने लढा देत आहेत.

फडते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून नो डेव्हलपमेंट झोनमधील बेकायदा रस्त्यांना आमचा विरोध आहे. तरीही पुन्हा टीसीपी विभागाने त्याच सर्व्हे नंबरमध्ये झोन बदलण्याची परवानगी दिली आहे, जी उतार आहे. ते पुढे म्हणाले की, अलीकडेच आम्ही एका स्थानिक कार्यकर्त्याचा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे, ज्यांनी आमच्या गावात केलेल्या झोन बदलाविषयी माहिती दिली आहे.आम्हाला आमच्या गावात कोणताही मोठा प्रकल्प नको आहे.

आमदार फेरेरांना निवेदन

गावकऱ्यांनी हळदोणेचे आमदार ॲड. कार्लोस अल्वारेस फेरेरा यांच्याकडेही जाऊन पाठिंबा मागणारे निवेदन त्यांना दिले. आमदारांनी गावकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की मला माहिती आहे की आमची जंगले, फळबागा, टेकड्यावर सर्व लोकांचा डोळा आहे. याविषयी मी मुख्यमंत्र्यांना फोन करून योग्य मागणी करेन आणि गरज पडल्यास आम्ही न्यायालयात जाऊ शकतो, असेही आमदार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT