Shirgao Lairai Jatra Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: 'लईराई देवी'च्‍या जत्रोत्सवासाठी शिरगाव सज्ज, प्रशासन सतर्क; होमकुंडाचे काम अंतिम टप्प्यात

Shirgao Lairai Jatra: देश-विदेशात ख्याती असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: देश-विदेशात ख्याती असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. संपूर्ण गावात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

येत्या मंगळवारी (ता. २१) जत्रोत्सव होणार असला, तरी जत्रेच्या दिवशी ओटी भरण्याची सुविधा नसल्याने भाविकांची पावले आतापासूनच शिरगावाकडे वळू लागली आहेत. रविवारी दिवसभर देवीचे दर्शन आणि नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिस व महाजन गर्दीवर नियंत्रण ठेवून आहेत.

‘भक्तांच्या हाकेला धावणारी आई’ अशी ख्याती असलेल्या श्री लईराई देवीच्या दर्शनासाठी धोंड भक्तगणांसह लाखो भाविक जत्रोत्‍सवाला येण्‍याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर यंदा जत्रा कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी प्रशासन आणि देवस्थान समिती सतर्क झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेसह विविध आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जत्रेची पूर्वतयारी म्हणून शनिवारी शिरगावात मॉक ड्रिलही घेण्यात आले.

होमकुंड हे या जत्रोत्‍सवाचे प्रमुख आकर्षण मानले जाते. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने होमखंडी कुटुंबीयांतर्फे होमकुंड उभारण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर होमकुंड उत्सव पार पडणार आहे.

जत्रोत्‍सवादिवशी वाहनांना प्रवेशबंदी

जत्रेच्या दिवशी मंगळवारी आपत्कालीन सेवा वाहने वगळता अस्नोडा बसस्थानक ते मंदिर मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू होणार आहे.

पार्किंग व पोलिस नियंत्रण कक्ष

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अस्नोडा बसस्थानक परिसर, नवीन बगलमार्ग, मंदिराच्या मागील बाजूसह विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केल्यास ती ताब्यात घेतली जाणार आहेत. होमकुंड स्थळासमोर पोलिस नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून, येथून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाणार आहे.

मंदिरासह परिसरात विद्युत रोषणाई

जत्रोत्सवानिमित्त श्री लईराई मंदिरासह परिसरातील अन्य मंदिरे आणि आस्थापनांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार मंदिराच्या मागील बाजूस आणि होमकुंड स्थळापासून काही अंतरावर दुकाने उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT