Goa Stampede Dainik Gomantal
गोवा

Goa Stampede: ‘लईराई’ जत्रेतील दुर्घटनेमागे माजी अध्यक्षांचा हात! विद्यमान देवस्थान समितीचा खळबळजनक आरोप

Lairai Jatra Stampede: ‘लईराई’ देवीच्या जत्रेवेळी शिरगावातील दुर्घटनेमागे देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांचा हात आहे, असा खळबळजनक आरोप विद्यमान देवस्थान समितीने केला आहे.

Sameer Panditrao

डिचोली: ‘लईराई’ देवीच्या जत्रेवेळी शिरगावातील दुर्घटनेमागे देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांचा हात आहे, असा खळबळजनक आरोप विद्यमान देवस्थान समितीने केला आहे. सरकारने नेमलेल्या समितीने या दुर्घटनेमागील सत्य शोधून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही विद्यमान देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, शिरगावमधील चेंगराचेंगरीला विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि देवस्थान समिती जबाबदार आहे, असा आरोप देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी केला आहे. व्यवस्थेसंदर्भात देवस्थान समितीने प्रशासनाला अजिबात विश्वासात घेतले नाही,असा आरोपही गणेश गावकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

Shirgao

या पार्श्वभूमीवर श्री लईराई देवस्थान समितीने आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत गणेश गावकर यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करून त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. गणेश गावकर अध्यक्ष असताना गेल्या वर्षी जत्रेच्या दिवशीच झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचे प्राण गेले होते. त्या दुर्घटनेनंतर तत्कालीन देवस्थान समितीने सुरक्षेसंदर्भात कोणती पावले उचलली. ते गावकर यांनी अगोदर जाहीर करावे, अशी मागणी विद्यमान देवस्थान समितीने केली आहे.

माजी अध्यक्षांनी लुटले!

मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात अध्यक्ष असताना गणेश गावकर यांनी देवस्थानचा निधी वाढविण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. उलट देवस्थानची तिजोरी साफ करण्याकडे त्यांचे अधिक लक्ष केंद्रित केले होते. गणेश गावकर यांनी केवळ तिजोरीच साफ केली नाही, तर देवस्थानची ‘सोनेरी'' लूट केली आहे, असा आरोपही विद्यमान देवस्थान समितीने केला आहे. श्री लईराई देवीची देश-विदेशात ख्याती आहे. त्यामुळे देवस्थानची प्रतिमा खराब होणार म्हणून गणेश गावकर यांनी केलेल्या कृत्यांबद्धल जाहीर वाच्यता करण्यात आली नव्हती. मात्र आता गणेश गावकर यांची एक-एक भानगड बाहेर येणार आहे, असे देवस्थान समितीने म्हटले आहे.

मृत भाविकांना श्रद्धांजली

शिरगाव जत्रेवेळी घडलेल्या दुर्घटनेत बळी पडलेल्या भाविकांना देवस्थान समितीकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. ही दुर्दैवी दुर्घटना आहे. अशी दुर्घटना पुन्हा कधीच घडू नये. अशी प्रार्थना देवस्थान समितीने केली आहे. शिरगाव येथील देवस्थान सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी उपाध्यक्ष वासू गावकर, सचिव भास्कर गावकर, खजिनदार आतिष गावकर, मुखत्यार दयानंद गावकर आदी पदाधिकारी तसेच विश्वंभर गावकर, उपेंद्र गावकर, बाबूसो गावकर आदी महाजन उपस्थित होते. जत्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात यावर्षी प्रशासनाकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळाले नाही. असेही देवस्थान समितीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT