Lairai Devi Jatra 2024 Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra 2024 : धनगरबांधवांची चौथी पिढी पाळते लईराईचे व्रत

Lairai Devi Jatra 2024 : लाखेरेत ५५ धोंड : आज ‘व्हडले जेवण’, उद्या लईराईचा जत्रोत्सव

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi Jatra 2024 :

डिचोली, शिरगाव येथील श्री लईराई देवस्थानच्या होमकुंड उत्सवात सहभागी होणारे तालुक्यातील शेकडो धोंड विविध तळांवर सोवळे पाळून कडक व्रत करीत आहेत. अनेक धोंडांच्या तळांना पिढीजात परंपरा आहे.

लाखेरे येथील तळावरील धोंड गेल्या चार पिढ्यांपासून लईराईचे व्रत करतात. ८५ वर्षीय धोंडासह एकूण ५५ धोंड सध्या या ठिकाणी व्रत पाळत आहेत.

लाखेरे येथील धोंडांच्या व्रतास प्रारंभ झाला आहे. १४ ते ८५ वर्षांपर्यंतचे धोंड येथे आहेत. येथील धनगर समाजातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धोंडांचाही यात समावेश आहे. दरवर्षी या तळावर नव्या धोंडांची येथे भर पडते, मात्र यंदा नवीन धोंडांची भर पडलेली नाही. आता आमची चौथी पिढी व्रत पाळत आहे, असे ज्येष्ठ धोंडांनी सांगितले.

बाळूमामांचा आशीर्वाद

लाखेरे येथे बाळूमामांचे छोटेसे मंदिर बांधण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मंदिरात या धोंडांचा तळ असतो तत्पूर्वी येथील नदीकाठी व नंतर कडकडे यांच्या भाटात तळ होता. बाळूमामांच्या आशीर्वादाने एकत्रित व्रत पाळण्याचा आनंद आणि उत्साह वेगळाच आहे, असे ज्येष्ठ धोंड बाबू ताटे यांनी सांगितले.

आज सर्वत्र ‘व्हडले जेवण’

जत्रेच्या आदल्या रात्री म्हणजेच शनिवारी (ता.११) धोंड भक्तगण व्रत पाळतात त्या तळांवर ''व्हडले'' जेवणाचा कार्यक्रम होतो. देवीचा प्रसाद म्हणून गाव जेवण वाढले जाते. मोठ्या संख्येने लोक यात सहभागी होतात. लाखेरे येथे व्हडले जेवणासाठी भाविक गर्दी करतात, अशी माहिती धोंडांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT