Lairai Devi Jatra 2024  Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra 2024 : ‘लईराई’ जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात ; रविवारी अग्निदिव्य

Lairai Devi Jatra 2024 : धोंड भक्तांच्या व्रतास प्रारंभ, शिरगावात भक्तीमय वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi Jatra 2024 :

डिचोली, ''भक्तांच्या हाकेला धावणारी आई'' असा ज्या देवीचा महिमा आहे, त्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

जत्रोत्सव साजरा करण्यासाठी देवस्थान समितीही सज्ज झाली आहे. येत्या रविवारी (ता.१२) जत्रा साजरी होणार असून पहाटे अग्निदिव्य होईल. तसेच कौलोत्सव साजरा होईपर्यंत पाच दिवस जत्रोत्सवाचा उत्साह असणार आहे.

दरम्यान, जत्रेनिमित्त धोंड भक्तगणांच्या कडक व्रतास प्रारंभ झाला असून विविध ठिकाणी तळ उभारून धोंड भक्तगण व्रत पाळीत आहेत. जत्रोत्सव दोन दिवसांवर आल्याने सध्या शिरगाव भक्ती आणि मंगलमय वातावरणात न्हाऊन गेले आहे.

श्री लईराई देवीची ख्याती देश-विदेशात पसरली असून, या देवीचे हजारोंनी धोंड मिळून लाखो भक्तगण आहेत. शिरगावची लईराई देवी ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दरवर्षी या जत्रोत्सवाला धोंड भक्तगणांसह भाविकांची प्रचंड गर्दी उसळत असते.

शेजारील राज्यांसह गोव्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण देवीच्या चरणाकडे येत असतात. विदेशी पर्यटकांनाही जत्रेविषयी आकर्षण आहे. विदेशी पर्यटकांचीही देवीवर श्रद्धा आहे. यंदाही जत्रोत्सवाला भाविकांचा महापूर लोटण्याची शक्यता आहे.

धोंडांच्या व्रतास प्रारंभ

गोव्यासह शेजारील राज्यातील वेगवेगळ्या भागातून मिळून देवीचे हजारो धोंड भक्तगण आहेत. गुढीपाडव्यानंतर साधारण महिनाभर पूर्ण शाकाहारी राहणारे धोंड भक्तगण जत्रेच्या आधी पाच दिवस कडक व्रत पाळतात. सध्या विविध भागातील धोंड भक्तगणांनी तळ उभारले असून कडक व्रत पाळण्यास सुरवात केली आहे.

काही तळावर महिला धोंड भक्तगणही आहे. नवीन धोंड पाच दिवस तर जुने धोंड तीन दिवस व्रत पाळतात.

फेरीत लाखो रुपयांची उलाढाल

शिरगावच्या जत्रोत्सवात खाजे, खेळणी, रेडिमेड कपडे, चहा, शीतपेय आदी विविध वस्तूंचे स्टॉल मिळून मोठी फेरी भरत असते. श्री लईराई देवीला मोगरीचे कळे प्रिय अशी भक्तांची भावना आहे. देवीवरील श्रद्धेपोटी शिरगावात येणारे प्रत्येक भाविक देवीला मोगरीची फुले अर्पण करतात.

बहुतेक भक्तगण नवस बोलल्याप्रमाणे ठराविक कळ्यांची माळा देवीला अर्पण करतात. जत्रा काळात शिरगावात वेगवेगळ्या भागातून मिळून प्रचंड प्रमाणात मोगरीच्या फुलांची आवक होत असते. जत्रोत्सव काळात शिरगावात मोगरीचा दरवळ पसरत असतो. मोगरी फुलांतून लाखो रुपयांचा व्यवहार होत असतो. अन्य साहित्य विक्रीतून मिळून जत्रोत्सव काळात मोठी आर्थिक उलाढाल होते.

श्री लईराई देवीची जत्रा सुरळीतपणे साजरी होण्यासाठी देवस्थान समितीचे अथक प्रयत्न असतात. यंदाही जत्रोत्सव साजरा करण्यासाठी देवस्थान समिती सज्ज झाली आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी शिरगावात भक्तांचा महापूर लोटत असतो. भक्तांच्या सेवेसाठी देवस्थान समिती सर्व ती काळजी घेण्यासाठी तत्पर असते. मात्र जत्रा सुरळीतपणे साजरी करण्यासाठी भक्तांनीही सहकार्य करावे, गर्दीवर नियंत्रण ठेवावे, मुख्य धार्मिक कार्यक्रम चालू असताना मंदिरात गर्दी करू नये.

-गणेश चंद्रकांत गावकर, अध्यक्ष, देवस्थान समिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT