Lairai Devi Jatra 2024  Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra 2024 : लईराई जत्रा यंदाही ‘गोबी’मुक्त; देवस्थान समितीचा दावा

Lairai Devi Jatra 2024 : जत्रेच्या दिवशी मध्यरात्री होमखण उत्सव असतो. यावेळी होमखणातून चौगुले समुदाय अग्निदिव्य पार करतात. धोंडगणांचे अग्निदिव्य पार पाडल्यानंतर चौगुले मानकरी अग्निदिव्य पार करतात. सर्वात शेवटी देवीचा कळस अग्निदिव्य पार करतो.

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi Jatra 2024 :

डिचोली, देवस्थान समितीच्या कडक भूमिकेमुळे शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा जवळपास ‘गोबी’मुक्त झाल्यातच जमा आहे. यंदाही शिरगावच्या जत्रेत 'गोबी' मंच्युरियनचे स्टॉल थाटण्यास बंदी घालताना या निर्णयाची कडकपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून 'गोबी मंच्युरियन'चे प्रस्थ वाढले आहे. गावोगावी साजऱ्या होणाऱ्या जत्रा आणि अन्य उत्सवावेळी 'गोबी'चे स्टॉल दिसून येत आहेत. नाही म्हटले, तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून डिचोलीतील कुडचिरे, लाडफे आदी काही मोजक्याच भागात 'गोबी'चे स्टॉल थाटण्यास बंदी घालण्यात येत आहे.

शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या दुकानांची मोठी फेरी भरत असते. २०२२ यावर्षी शिरगाव जत्रेत 'गोबी'च्या स्टॉलवर बंदी घालण्याचा निर्णय स्थानिक पंचायतीने घेतला. बंदी घालण्याच्या निर्णयानंतर २०२२ यावर्षी व्यावसायिकांनी जत्रेच्या फेरीत स्टॉल घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा तो प्रयत्न सफल झाला नाही. गेल्यावर्षी जत्रोत्सवाच्या काळात तर 'गोबी मंच्युरियन'वाले शिरगावात फिरकले नाहीत. आता यंदाही जत्रेत 'गोबी'चे स्टॉल थाटण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे देवस्थान समितीने ठरविले आहे. त्यामुळे यंदाही शिरगावच्या जत्रेत 'गोबी'चे स्टॉल असणार नाहीत. हे स्पष्ट झाले आहे.

चौगुले मानकऱ्यांचे व्रत सुरू

मये श्रीदेवी लईराईच्या जत्रौत्सवानिमित्त शिरगाव येथील चौगुले मानकऱ्यांच्या पवित्र व्रतास रविवार ५ मेपासून सुरुवात झाली असून शनिवार ११ मेपर्यंत त्यांचे ब्राम्हणाच्या घरी भोजन चालणार आहे. जत्रेच्या दिवसापासून पाच दिवस चौगुले समुदायाला केवळ फलाहार करावा लागतो. श्री लईराई देवीच्या जत्रौत्सवाच्या अनुषंगाने चौगुले मानकऱ्यांकडून पाळणाऱ्या व्रताला विशेष असे महत्त्व आहे.

जत्रेच्या दिवशी मध्यरात्री होमखण उत्सव असतो. यावेळी होमखणातून चौगुले समुदाय अग्निदिव्य पार करतात. धोंडगणांचे अग्निदिव्य पार पाडल्यानंतर चौगुले मानकरी अग्निदिव्य पार करतात. सर्वात शेवटी देवीचा कळस अग्निदिव्य पार करतो. अग्निदिव्याला सामोरे जाण्यासाठी चौगुले समुदायाला विशेष असे व्रतपालन करावे लागते. चौगुले समुदायाची संख्या एकूण २२ आहे.

माझ्या अध्यक्षतेखाली नवीन देवस्थान समिती निवडून येताच २०२२ साली 'गोबी' स्टॉल थाटण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन पंचायत मंडळाची भूमिका आणि सहकार्य महत्वाचे होते. बंदीची गोबी मंच्यूरियनवाल्यांनी धास्ती घेतली आहे. जत्रा सोडाच गावातील अन्य उत्सवावेळी 'गोबी'चे स्टॉल थाटण्याचा विचार ते करीत नाहीत. शिरगाव 'गोबी'मुक्त झाल्यातच जमा आहे.

- गणेश चंद्रकांत गावकर, अध्यक्ष, देवस्थान समिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाला ‘मानवाधिकार’ने फटकारले! शौचालयांमध्ये दरवाजांचा अभाव; जॅमरसह सीसीटीव्‍हींची शिफारस

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

Goa live News: वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूकीवर परिणाम

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT