Goa: लाडलीलक्ष्मी मंजुरी पत्रे Dainik Gomantak
गोवा

Goa: नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते लाडलीलक्ष्मी मंजुरी पत्रे देण्यात आली

एकूण 85 जणींना लाडलीलक्ष्मी मंजूर पत्रे मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: जे सरकार, जी पार्टी, व जो माणूस तुमच्यासाठी वावरतो, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्यांच्या पाठीशी छातीठोकपणे पुढे येऊन त्या पार्टीसाठी, माणसासाठी मनसोक्तपणे काम करण्यास पुढे येण्याचे आवाहन नगर विकास मंत्री यांनी केले. (Ladlilakshmi sanction letters were distributed to 85 people in Goa by Minister Milind Naik)

मुरगाव तालुक्यातील तसेच मुरगाव मतदार संघातील 160 जणांपैकी 85 जणींना मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते बोगदा येथे त्यांच्या शासकीय बंगल्यावर लाडलीलक्ष्मी मंजुरी पत्रे देण्यात आली, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या योजनांच्या गोवेकरांना भरपूर फायदा झाला असल्याचे सांगितले. तसेच त्या चालू आहेत, मात्र काही योजना वितरण करण्यास विलंब झाला. मात्र त्या बंद पाडण्यात आल्या नाहीत. लोकांच्या हीतावह सरकार या योजना राबवित आहे.

भारतीय जनता पार्टीचे ते कामच आहे. कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता भाजपा या योजना राबवित आहेत, आणि त्या तशाच चालू राहणार आहेत. या योजना प्रलंबित राहिल्या त्या आता पुढे चालू करत असल्याचे मंत्री नाईक म्हणाले.गोवा सरकारकडून युवतींना मिळालेली भेट खूप महत्त्वाची आहे. ज्याच्यामुळे त्यांना आधार मिळतो डोक्यावरचे ओझे काही प्रमाणात कमी होते असे ते म्हणाले.

एकूण 85 जणींना लाडलीलक्ष्मी मंजूर पत्रे मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेविका म‌णाली पार्सेकर, दामोदर नाईक,प्रजय मयेकर, माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब,माजी नगरसेवक मुरारी बांदेकर व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मदीन दळवी, उषा नाईक, सोनम महाले, संजीवनी किनळेकर, शकीनबी शेख, शबना मोहीद्दीन, वजीर शेख, बि रंगीता, नगम्मा मदार, कैसनबी शेख, शबीना बानु, अनातिल्दा डायस,मबेल डिसोजा,शकीलाबी मोकाशी,नदीच्या,शमीम बानू, पल्लवी केरकर, जोस्ना शेट्टे, राधिका तिरोडकर, गौरवी पोळ,सोफीया फर्नांडिस,लझीना सय्यद,अलेन्सी लोबो, करिष्मा वळवईकर, दीपा मांद्रेकर, सुविधा चोडणकर, नसीना बानू, सविता अदमानी, श्रीदेवी कांबळे,महब शेख, जेनिफर डीक्रूज, प्रियंका केसरकर, रेशम बी, हसीना शेख,शबना मकंदर, सुजाता लमानी,मलनबानू मोकाशी, अंजुमबी मूल्ला,हीनाबी संकद, मोदींनाबी मकंदर, संगीता लमानी, तनवी चिंतामणी, अक्षया महाले, अमिना शेख,अलफिना फर्नांडिस, स्नेहा खांडेपारकर, स्नेहा तारी, लेस्लीना डा गामा, स्टेफनी डायस, रेणुका लिंगायत,लूबनाझ,यल्लवा मदार, नझीया साहेब, यास्मिन मकंदर, हाजिरा शेख,हूसैनबी, सय्यद, रेश्मा गावस, दिलसात मुजावर, अनिषा खाजूंबी, मरफीर फर्नांडिस, सोनिया राणे, सुवर्णा मांद्रेरेकर,तैफीम शेख, नैना शिरोडकर, तेजश्र्वरी तळकर, गीता मदार, संयुक्ता जोशी,मेहता बफ्रीन,तरवलूंबी पठाण, शीतल सारंग, नझीया शेख, ज्योती वयाची, रूपाली शेर्लेकर,एलेयस लोबो,मारीया पेरेरा, असलेशा गाड,फरहा शेख, स्मिता पोखरे, अक्षता हळणकर, श्वेता परब, पुनम कांबळी, दर्शन रेडकर, लतिफा शहा यांना मंजुरी पत्रे वितरित करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT