Ladakh student drowned in goa river accident Dainiak Gomantak
गोवा

Ladakh Student Death Goa: लडाखमधील विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; ओकांब नदीत बुडून मृत्यू: खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

IIT Goa Student Drowning News: गोव्यात शिक्षणासाठी आलेल्या लडाखमधील २१ वर्षीय विद्यार्थ्याचा धारबांदोडा तालुक्यातील ओकांब येथे नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: गोव्यात शिक्षणासाठी आलेल्या लडाखमधील २१ वर्षीय विद्यार्थ्याचा धारबांदोडा तालुक्यातील ओकांब येथे नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. डोंगराळ आणि थंड हवामानाच्या प्रदेशातून आलेल्या या विद्यार्थ्याला गोव्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात होती. सोमवारी दुपारी अग्निशमन दलाच्या जवानांनी खोल पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला.

इम्तियाज हुसेन (वय २१, मूळ रा. लडाख) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो फर्मागुढी येथील आयआयटीमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी सुट्टी असल्याने इम्तियाज आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी बाहेर पडला होता. सुरुवातीला हा गट एका बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेला होता. मात्र, स्थानिक युवकांनी त्यांना तेथून हटविल्यानंतर ते ओकांब येथील नदीकाठी गेले.

तेथे नदीत उतरल्यावर इम्तियाजला खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न अपयशी ठरला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व फोंडा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला.फोंडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील रुग्णालयात पाठविला आहे.

भावाने फोडला हंबरडा

इम्तियाजचा भाऊ व अन्य नातेवाईक फोंडा पोलिस स्थानकात आज सकाळी दाखल झाले. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर भावाने एकच हंबरडा फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.

गेल्यावर्षीही झाली होती दुर्घटना

स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, उन्हाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक व युवक आंघोळीसाठी येतात. मात्र, नदीतील खोल पाण्याची कल्पना नसल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. गेल्या वर्षीही याच ठिकाणी काणकोण येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT