Water Shortage Problem Kulem, Goa
Water Shortage Problem Kulem, Goa Dainik Gomantak
गोवा

Pernem News : पेडण्यात पाणीटंचाई; ‘साबांखा’त कर्मचाऱ्यांची कमतरता

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी विभागाच्या कार्यालयात कर्मचारी आणि अभियंत्यांची उणीव असून पूर्वी चार अभियंते कार्यरत होते सध्या दोन अभियंत्यांवरच काम चालवले जात आहे. त्यामुळे त्या दोघांवर ताण येत असून काही कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळेही काही पदे रिक्त आहेत. त्यांच्या जागी नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. अतिरिक्त अभियंते आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी होत आहे

पेडणे तालुक्यासाठी पूर्णपणे पाण्याची सोय करण्यासाठी पाणी विभागाकडे पूर्वी चार अभियंते होते. सध्या दोन अभियंते आहेत. त्यातील संदीप मोरजकर हे अभियंते कायमस्वरूपी सेवेत आहेत.

तर दुसरा अभियंते गौरीश ठाकूर हे सोसायटीच्या अंतर्गत असल्यामुळे आणि दोन अभियंत्यांची गरज असूनही सरकारने या अभियंत्याची नियुक्ती केली नाही. या अभियंत्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका चालू असतात. त्यामुळे इतर कामांसाठी किंवा देखभाल व दुरुस्तीबाबत नियोजनासाठी त्यांना वेळच मिळत नाही,असा त्यांचा दावा आहे.

अतिरिक्त अभियंते व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करून पाणी समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यात 24 नवे जलकुंभ

पेडणे तालुक्यातील जनतेला पूर्णपणे पाण्याची समस्या सुटावी यासाठी गावागावात नवीन जलकुंभ उभारण्याला मंजुरी मिळालेली आहे. एकूण 24 नवीन टाक्या उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

त्यात नानाची पाणी भूतवाडी या ठिकाणी दोन टाक्या वारखंड, तोरसे, वझरी, हरमल, पत्रादेवी, धारगळ, नागझर, तुये इस्पितळ, मुरमुसे, पराष्टे, तुये औद्योगिक वसाहत पेडणे, कासारवर्णे, हणखणे, उगवे, इब्रामपूर, तोरसे हरिजन वाडा, आगरवाडा, मालपे, दाडाचीवाडी धारगळ अशा ठिकाणी टाक्या उभारण्याचे काम सुरू झालेले आहे.

त्यातील 14 टाक्यांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. आणखी 10 टाक्या पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT