porvorim flyover traffic Dainik Gomantak
गोवा

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Porvorim Flyover Traffic: उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्वरीत होत असलेली वाहतुकीची प्रचंड कोंडी नियंत्रित करण्यासाठी तेथे वाहतूक पोलिस नियुक्त करण्‍यात आले आहेत. मात्र, रखरखत्‍या उन्‍हात उभे राहून त्‍यांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Traffic Police at porvorim flyover

पणजी: उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्वरीत होत असलेली वाहतुकीची प्रचंड कोंडी नियंत्रित करण्यासाठी तेथे वाहतूक पोलिस नियुक्त करण्‍यात आले आहेत. मात्र, रखरखत्‍या उन्‍हात उभे राहून त्‍यांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. शिवाय मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडी ही आता नित्‍याचीच झाली आहे. सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.

त्‍यावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी वाहतूक पोलिस तासन्‌ तास उन्हात उभे राहून काम करतात. मात्र, त्यांना उभे राहण्यासाठी योग्य जागा आणि निवारा उपलब्ध नाही. त्‍यामुळे त्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

...तर चांगले काम करू शकू!

याबाबत तेथील एका वाहतूक पोलिसाने सांगितले की, आम्ही आमचे कर्तव्य निष्ठेने बजावतो. सरकारने आमच्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भर दुपारच्‍या वेळी कडकडीत उन्हात उभे राहून काम करणे खूप कठीण आहे. योग्य सुविधा मिळाल्या तर आम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT