Verna Bus  Dainik Gomantak
गोवा

Verna Bus Accident : ..माणुसकी जिंकली! ‘त्या’ वारसांना मिळणार भरपाई; कामगार आयुक्तांनी राबवली बिहारमध्ये शोधमोहीम

Goa Accident News: वेर्णा येथे २५ मे रोजी रात्रीच्या वेळी बसखाली रमेश महातो, विनोदसिंह, राजेंद्र महातो आणि अनिल महातो हे चार कामगार चिरडून ठार झाले होते. ते कुद्रोली बिल्डर्स ॲण्ड इन्फास्ट्रक्चर्सकडे काम करत होते. ते पूर्व चंपारण-बिहारमधील होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Labour Commissioner Helps For Compensation to Kin of Four Deceased Labourers from Bihar

पणजी: रस्त्यावर बसखाली चार कामगार चिरडतात. त्या कामगारांच्या कंत्राटदाराकडे बिहारमधील त्यांचे पत्ते असतात. त्यांना भरपाई देण्यासाठी वारसांशी संपर्क साधण्याचे सारे उपाय थकतात. अखेर वारस मिळत नाहीत, या निष्कर्षाप्रत सरकारी यंत्रणा येते. याच वेळी कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यात लक्ष घालतात आणि वारसांच्या शोधासाठी चक्क बिहारमध्ये शोधमोहीम राबवून त्यांना शोधतात.

एखाद्या चित्रपटात शोभेल, अशी माणुसकीची ही कथा सत्यातील आहे. वेर्णा येथे २५ मे रोजी रात्रीच्या वेळी बसखाली रमेश महातो, विनोदसिंह, राजेंद्र महातो आणि अनिल महातो हे चार कामगार चिरडून ठार झाले होते. ते कुद्रोली बिल्डर्स ॲण्ड इन्फास्ट्रक्चर्सकडे काम करत होते. ते पूर्व चंपारण-बिहारमधील होते. त्यांच्या वारसांना भरपाई मिळणार होती. त्यांच्या वारसांपर्यंत पोहचण्यासाठी सारे प्रयत्न कामगार खात्याकडून करण्यात आले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आले. तेथील कामगार आयुक्तांना या भरपाईविषयी कळवण्यात आले, मात्र कोणीच त्यांच्या वारसांना शोधू शकले नाही. यामुळे भरपाईची रक्कम सरकारी गंगाजळीत जमा होण्याची वेळ आली होती.

डॉ. मार्टिन्स गरीब कुटुंबीयांना आपण मदत देऊ शकत नाही, असा विचार करून व्यथित झाले होते. त्यांनी ही सल आपल्या एका मित्राला बोलून दाखवली. त्या मित्राने सामाजिक कार्यकर्ते कुमार कलानंद मणी यांच्या कानी घातली. त्यांनी बिहारच्या पूर्व चंपारण जिल्‍ह्यातील असंघटित मजुरांसाठी काम करणारे अभिषेक कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आठवडाभरात या मजुरांच्या वारसांना शोधले. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर अखेर मजुरांचे वारस आज रात्री गोव्‍यात दाखल झाले. २४ रोजी त्यांना भरपाई देण्यासाठीची प्रक्रिया होणार आहे.

कमावते हात गमावलेल्यांना आशेचा किरण

याआधी एका कंपनीतील स्फोटात मरण पावलेल्या महाराष्ट्रातील दोन कामगारांना प्रत्येकी १२ लाख रुपयांची भरपाई डॉ. मार्टिन्स यांनी मिळवून दिली होती. आताही या चार कामगारांना तेवढीच भरपाई देण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दिवाळीच्या तोंडावर कमावता हात गमावलेल्या त्या कुटुंबीयांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण देण्याचे काम कामगार आयुक्त या रुक्ष पदावर असतानाही त्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

SCROLL FOR NEXT