Goa Crime: धक्कादायक! कळंगुटमध्ये कर्नाटकातील दोघांनी उचलले टोकाचे पाऊल; एकाचा मृत्यू तर महिला जखमी

Calangute Crime News: कळंगुटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका हॉटेलमध्ये कर्नाटक येथील असणाऱ्या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
Goa Crime: धक्कादायक! कळंगुटमध्ये कर्नाटकातील दोघांनी उचलले टोकाचे पाऊल; एकाचा मृत्यू तर महिला जखमी
Calangute Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: राज्यात पर्यटन हंगाम सुरु झाल्याने किनारी भागात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. देशी पर्यटकांची बागा-कळंगुट सुमद्रकिनाऱ्याला विशेष पसंती आहे. याचदरम्यान, कळंगुटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका हॉटेलमध्ये कर्नाटक येथील असणाऱ्या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एकाचा मृत्यू तर महिला जखमी झाली.

आत्महत्येचा पोलिसांना फोन!

दरम्यान, कळंगुट येथील खोबरावाडा येथील हॉटेल बोनांझामधून पोलिसांना आत्महत्या झाल्याची माहिती देणारा फोन आला. त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. महेश सुंतनूरे (वय वर्ष, 45, राहणार कर्नाटक) याने गळफास घेवून जीवन संपवल्याचे समोर आले. तर त्याच्यासोबत असलेली महिला सोनाली (वय वर्ष, 25, कर्नाटक) हिच्या मनगटाला जखम झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ जखमी असलेल्या सोनालीला जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

Goa Crime: धक्कादायक! कळंगुटमध्ये कर्नाटकातील दोघांनी उचलले टोकाचे पाऊल; एकाचा मृत्यू तर महिला जखमी
Goa Crime: ..अखेर अट्टल गुन्हेगार गजाआड! 100 घरफोड्यांमध्ये सहभाग; जुने गोवे पोलिसांची यशस्वी कामगिरी

विवाहबाह्य संबंधाची शक्यता?

मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि सोनाली यांनी 19 ऑक्टोबर रोजी हॉटेल बोनांझामध्ये चेक इन केले होते. तर त्यांचा चेक आऊट कॉल 20 ऑक्टोबर रोजी होते. मात्र त्यांनी हॉटेलमधील एक दिवसाचा मुक्काम वाढवला होता. दरम्यान, पोलिसांच्या तपासानुसार, सोनाली ही विवाहित असून तिचे चार वर्षांपूर्वी लग्न (Marriage) झाले होते. तर महेश हा देखील विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. एकंदरीत प्रकरणाचे स्वरुप पाहता आत्महत्येस विवाहबाह्य संबंध कारणीभूत असावेत अशी शक्यता वर्तवली जातेय. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com