Laborer Death in Margao 
गोवा

Margao News: वीजधक्क्याने मृत्यू झालेल्या 'त्या' मजुराला न्याय कधी मिळणार? अडीच महिन्यांनंतरही चौकशी नाही

32 वर्षीय आशुतोष आनंद नावाच्या मजुराचा विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला होता

दैनिक गोमन्तक

Laborer Death in Margao: 20 मे रोजी मडगाव जुन्या हरिमंदिरासमोरील जागेत सकाळच्या सुमारास बिहारच्या एका 32 वर्षीय आशुतोष आनंद नावाच्या मजुराचा विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. या घटनेस आता अडीच महिने उलटले तरी त्याची चौकशी झाली नाही. त्यामुळे या घटनेस जबाबदार कोण? दोषीवर कारवाई झाली का? ज्या मजुराचा मृत्यू झाला त्याला न्याय मिळाला का? असे अनेक प्रश्र्न सध्या उपस्थित होत आहेत.

माहितीनुसार, वीज खात्याच्या निरीक्षकाने अजून चौकशीच सुरू केली नसल्याचे कळते. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की जो पर्यंत वीज खात्याकडून अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांच्या चौकशीला सुरवात करता येणार नाही. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना चौकशीचे व अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

वीज खात्याने चौकशी करून अहवाल तयार करण्याची जबाबदारी एका विद्युत निरीक्षकांवर सोपवली होती. एका दुकानदाराने आपल्या जाहिरात फलकाला विद्युत पुरवठा व्हावा,यासाठी वीज वाहिनी टाकली होती.

या वीज वाहिनीमुळे मजुराचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नगरपालिकेने या जाहिरात फलकाला वीज पुरवठ्याची परवानगी दिली होती का?, हा प्रश्र्न सुद्धा इथे उपस्थित केला जात आहे. जर दिली नसेल तर त्याची चौकशी पालिकेद्वारे करण्यात आली आहे का? असे सवाल आता विचारले जात आहेत.

दुकानदाराची चूक

येथील एका दुकानदाराची वीजेची तार  त्या ठिकाणी जमीनीवरच पडली होती. त्या मजुराचा पाय त्यावर पडला आणि त्याचा मृत्यू झाला असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यानी याची गंभीर दखल घेतली.

त्यानी सांगितले की यात वीज खात्याची काहीही चूक नसुन वीजेचे पॅनल ठीकठाक होते. त्यानी नंतर वीज खात्याच्या अभियंत्याशी संपर्क साधला व  त्या दुकानदाराला नोटीस पाठविण्याचे आदेश दिले. या नोटीसची प्रत पोलिसांना सुद्धा पाठविण्यास सांगितले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT