Goa Ration: नागरी पुरवठा खात्याने घेतला सडक्या तांदळाचा धसका; मडगाव, दवर्लीतील छापे

काही दुकानदारांनी सांगितले, गेल्या तीन महिन्यांपासून खराब तांदळाचा पुरवठा होतोय त्यामुळे हा तांदूळ लाभार्थी नेत नाहीत व आम्हाला नुकसान सोसावे लागते.
Ration Shop
Ration Shop Dainik Gomantak

Goa Ration गोव्‍यात पुन्‍हा एकदा स्वस्त धान्य दुकानांमधून देण्यात येत असलेल्या तांदळाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला अनुसरून नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षकांनी आज मडगाव, दवर्ली भागातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये छापे टाकून तपासणी केली.

नागरी पुरवठा खात्याच्या एका निरीक्षकाने सांगितले, की नागरी पुरवठा खात्याने मे व जून महिन्यात ११३१ तांदळाची पोती बदलून दिलेली आहेत. आम्ही कोणत्याही स्वस्त धान्य दुकानदारावर दबाव टाकत नाही.

Ration Shop
Rahul Gandhi: राहुल गांधींचे श्‍‍वानप्रेम आणि गोवा दौरा !... वाचा हे अनोखे वृत्त

लोकांना चांगला तांदूळ मिळावा म्हणूनच आम्ही तपासणी करीत आहोत. आज केलेल्या तपासणीत कुठेही खराब तांदूळ सापडलेला नाही. जे लाभार्थी रेशन घेण्यासाठी आले, त्यांच्याकडेही चौकशी केली व त्यांनीही तक्रार केलेली नाही.

एका स्वस्त धान्य दुकानांमध्ये गेल्या महिन्यात पुरवठा केलेल्या तांदळाची अनेक पोती सापडली. महिला दुकानदाराने सांगितले की हा तांदूळ या महिन्यात लाभार्थ्यांना वितरित केला जाईल.

Ration Shop
Goa Mine: ...तोपर्यंत कावरेत खाणींना परवाने नाहीत, सरकारतर्फे ग्रामस्थांना हमी

दुकानदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

काही दुकानदारांनी सांगितले, की गेल्या तीन महिन्यांपासून खराब तांदळाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे हा तांदूळ लाभार्थी नेत नाहीत व आम्हाला नुकसान सोसावे लागते. दवर्लीतील एका दुकानदाराने सांगितले, की निरीक्षकांना समस्या सांगितली असली, तरी ते ती गांभीर्याने घेत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com