Kusmali Bridge Dainik Gomantak
गोवा

Kusmali Bridge: जांबोटी-कुसमळी पूल वाहतुकीस खुला, दुचाकी, चारचाकींना परवानगी; गोमंतकीयांना दिलासा

Belgaum Chorla Road Open: बेळगाव-चोर्ला मार्गावरील कुसमळी पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाल्यामुळे गेला महिनाभर बंद असलेला मार्ग १ जुलैपासून सुरू करण्यात आला.

Sameer Amunekar

जांबोटी: बेळगाव-चोर्ला मार्गावरील कुसमळी पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाल्यामुळे गेला महिनाभर बंद असलेला मार्ग १ जुलैपासून सुरू करण्यात आला. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता खुला करण्यात आला असून अवजड वाहनांना खानापूरमार्गे बेळगाव गाठावे लागत आहे. मलप्रभा नदीवरील पुलांचे काम अजूनही बाकी आहे, ते पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांसाठी हा पूल खुला करण्यात येणार आहे.

कर्नाटकचे महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी कुसमळी पुलाची काल पहाणी केली, त्यानंतर यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व कंत्राटदाराशी चर्चा करून पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अवजड वाहतुकीवर बंदी घातली आहे. पुलाचे भराव आणि इतर कामे झाल्यानंतर परवानगी द्या, अशी मंत्र्यांनी सूचना केली. यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार, जिल्हा पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद होते.

कुसमळी पुलावर पोहोचताच ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी आणि महांतेश राऊत यांनी बैरेगौडा यांचे स्वागत केले. काँग्रेस नेते यशवंत बिरजे यांनी गायरान संदर्भातील माहिती बैरेगौडा यांनी देऊन सरकारी जमिनी बळकावल्याचे सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांशी तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते पुन्हा बेळगावकडे रवाना झाले.

बेळगाव-गोवा रस्त्यावरील कुसमळीतील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण व धोकादायक बनला होता. येथून अवजड वाहनांची वाहतूक होताना पुलाला हादरे बसत होते. त्यामुळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चोर्ला रस्त्याच्या विकासाबरोबरच कुसमळी पुलाच्या पुन:निर्माणाचे काम हाती घेण्यात आले. ब्रिटिशकालीन जुना पुल काढून त्याच ठिकाणी नवीन पूल उभारण्यात आला आहे.

चोर्ला घाटात धुके!

जांबोटी-कुसमळी येथील पूल छोट्या वाहनांसाठी खुला झाला असला तरी चोर्ला घाटात प्रचंड प्रमाणात सकाळ-संध्याकाळी धुके पसरत आहे. समोरचे वाहन दिसत नाही, इतके दाट धुके या भागात सुरू आहे.

त्यामुळे वाहनचालकांनी सावधपणे वाहने चालवावी, गाडीचे दिवे सुरू ठेवावे, असा सल्लाही बैरेगौडा यांनी पुलाच्या पाहणीनंतर उपस्थितांना केला.

अवजड वाहनांना बंदी!

मंत्री बैरेगौडा यांनी पुलाची पाहणी करून भराव योग्य रीतीने घाला. संरक्षक भिंत बांधून घ्यावी. ४५ दिवसांनंतर पाहणी करून अवजड वाहतूक सुरू करावी, अशा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. रस्ता फक्त दुचाकी, चारचाकी छोट्या वाहनांसाठी खुला करण्यात आला असून या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश देऊ नये. या ठिकाणी पहारा ठेवावा, असा आदेशही त्यांनी दिला.

९० मीटर लांब पूल

हा पूल ९० मी. लांब तर साडेपाच मीटर रुंद आहे. नवीन पुलाचे काम हाती घेण्यापूर्वी नदीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी मातीचा भराव टाकून दहा पाईप घालून वाहतुकीसाठी पर्यायी पुल व रस्ता बनवण्यात आला होता.  पण जून महिन्यात हा रस्ता तीनवेळा वाहून गेला आहे. त्यामुळे रस्ता बंद होता. बेळगाव आणि गोव्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून बेळगाव - चोर्ला - गोवा मार्गांची ओळख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापशात शासकीय इमारतीला ‘लिफ्ट’ नाही! 3 मजले चढून जाण्यात ज्येष्ठांचे होतायत हाल

Goa Tourism: गोव्यात काचेच्या बाटलीतून बिअर विक्री होणार बंद? सार्वजनिक ठिकाणी दारुची बाटली फोडल्यास 50,000 दंडाची तरतूद

PM Kisan 20th installment: PM किसान योजनेच्या 20वा हप्त्याची तारीख जाहीर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार पैसे

Goa Assembly Live: आणखी दोन खाण ब्लॉक सुरू करण्यास परवानगी

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले, पण अचानक संघर्षविराम का केला? 'पाकव्याप्त काश्मीर' ताब्यात का घेतला नाही?

SCROLL FOR NEXT