Kushavati River Flood Dainik Gomantak
गोवा

केपे भागात मुसळधार पाऊस; कुशावती नदीला पूर

केपे ते मडगाव मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक चांदरमार्गे वळवली आहे.

सुशांत कुंकळयेकर

केपे : पावसाने कालपासून जोर धरल्याने राज्यात बऱ्याच ठिकाणी पाणी भरण्याचे प्रकार वाढले आहेत. दक्षिण गोव्यातही मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असून दरवर्षीप्रमाणे गुडी पारोडा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पारोडा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे.

केपे ते मडगाव हा मुख्य रस्ता पर्वत पारोडा येथे पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली आहे. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता पारोडा येथे रस्ता पाण्याखाली गेला, तसेच पारोडा येथील कुशावती नदीवरील पूलही पाण्याखाली गेल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

अवेडे, कोथंबी गावांना जोडणारा हा पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. पण अद्याप यावर कोणताच तोडगा न काढल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यभर नवीन पूल तसेच रस्त्यांची कामे चालू असून सरकारने कुशावती नदीवरी नवीन पुलाचे काम हाती घेऊन लोकांची समस्या दूर करावी अशी लोकांनी मागणी केली आहे.

दुसरीकडे कुशावती नदीच्या प्रवाहात अडकलेल्या एकाला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Divjotsav 2025: 25-30 वर्षांपूर्वी गोव्यात चिकण मातीचेच दिवे दिसायचे, पितळीच्या दिवजांची वाढती संख्या; बदलता दिवजोत्सव

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये शोषितांचे काय चुकले?

Child Abuse Awareness: गोव्यात एका वर्षात 202 बालकांवर अत्याचार; दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज

Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

SCROLL FOR NEXT