Goa Third District Dainik Gomantak
गोवा

Kushavati District Goa: 'कामे झाली तरच उपयोग'! नव्या ‘कुशावती’ जिल्ह्याकडून लोकांच्या अपेक्षा; काय आहेत प्रतिक्रिया, वाचा..

Goa Third District: तिसरा जिल्हा घोषित केल्याने सांगे भागातील जनतेसाठी प्रशासन आणि जनता यातील अंतर कमी होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करू लागली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kushavati District Expectations : सरकारने ‘कुशावती’ हा नवीन जिल्हा घोषित केल्यानंतर त्याबाबत सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा या तालुक्यांचा त्यात सहभाग असल्यामुळे तेथील जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काहींनी याचे स्वागत करत काही सुधारणा झाल्यास हा निर्णय तेथील जनतेसाठी फायद्याची ठरेल, अशा प्रतिक्रिया दिल्या. त्याचा घेतलेला आढावा.

तिसरा जिल्हा घोषित केल्याने सांगे भागातील जनतेसाठी प्रशासन आणि जनता यातील अंतर कमी होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करू लागली आहे. कुशावती जिल्ह्याचे काम प्रत्यक्षरीत्या कधीही सुरू होऊ द्या; पण आजपर्यंत प्रशासकीय कामासाठी घेतलेल्या अनुभवापेक्षा सुखद अनुभव मिळाल्यास जनता नक्कीच सुखावेल यात शंका नाही.

उपजिल्हाधिकारी कार्यालये झाली; पण अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे दोन दिवसांत होणारी कामे आठ दिवसांनी होऊ लागल्यास नवीन जिल्हा होऊन काहीच बदल नाही, असे म्हणायची वेळ कोणावर येऊ नये इतकी काळजी सरकारला घ्यावी लागणार; तरच खेड्यापाड्यातील जनता हे प्रशासन काम करते असे म्हणेल.

सांगेसारख्या प्रशस्त विस्तारलेल्या खेडेगावातील जनतेला जिल्हाधिकारी कार्यालय गाठण्यासाठी साळजिणी ते मडगाव हे येण्या-जाण्यासाठी दीडशे किमी अंतर गाठावे लागत असे आणि काम न झाल्यास परत खेपा माराव्या लागत असत. आता ‘कुशावती’ जिल्हा कार्यरत झाल्यास येण्या-जाण्यासाठी साळजिणीवासीयांना किमान तीस किमी अंतर कमी होईल.

सांगे मतदारसंघातील सर्व गावांबरोबर सावर्डे मतदारसंघातील काले, कष्टी, सावर्डे, दाबाळ, कुळे, मोले ग्रामपंचायत वासीयांना कुशावती जिल्हा अंतराच्या दृष्टीने जवळचा होणार आहे. केवळ साकोर्डा पंचायत वासीयांना अंतर थोडासे लांब पडणार आहे. जिल्ह्यात लागणाऱ्या सर्व साधनसुविधांची शासनाने त्वरित उभारणी करणे आवश्यक आहे.

देशातील १०२ नव्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये गोव्याच्या ‘कुशावती’चाही समावेश

भाजप सरकारने संपूर्ण देशात १०२ खास नव्‍या जिल्‍ह्यांची स्‍थापना केली असून त्‍यात गोव्‍यातील तिसऱ्या ‘कुशावती’ या जिल्‍ह्याचाही समावेश आहे. गोव्‍यासाठी ही एक सन्‍मानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

या जिल्‍ह्यातील चारही तालुक्‍यांना कुशावती नदीने जोडले आहे. या कुशावतीच्‍या तीरावर १२ हजार वर्षांपूर्वी संस्‍कृती होती, हे या भागात असलेल्‍या प्रस्‍थर शिल्‍पावरून दिसून येेते. त्‍यामुळे या जिल्‍ह्याला कुशावतीचे नाव देऊन या हजारो वर्षांच्‍या परंपरेचा सन्‍मान केला आहे, अशी प्रतिक्रिया फळदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT