Kundaim Industrial Estate Road Dainik Gomantak
गोवा

Kundaim Roads: 'वाहने चालवायची कशी?' कुंडई औद्योगिकमधील रस्त्यांवर वाहनचालक संतप्त

Kundaim Industrial Estate Road: बसगाड्या तसेच जीपगाड्यांची संख्याही मोठी असल्याने खराब रस्त्याचा फटका कामगारांना बसतो

गोमन्तक डिजिटल टीम

मडकई: कुंडई औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची पार दैनावस्था झाली असून या रस्त्यावरून वाहतूक करणे डोकेदुखी ठरल्याच्या प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालवायची कशी? असा सवाल वाहनचालक आणि नेहमी या वसाहतीत कामाला जाणाऱ्या कामगारांकडून केला जात आहे.

या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुझवावे. पावसाने विश्रांती घेतल्‍यामुळे त्वरित रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतर्फे करण्यात येत आहे. एप्रिल-मे महिन्यात रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच रस्‍त्याची अवस्था बिकट झाली आहे.

कुंडई औद्योगिक वसाहतीत वाहनांची कायम वर्दळ सुरू असते. अवजड ट्रकांची वाहतूक या रस्त्यावरून होत असल्याने रस्त्यावर ताण पडतो. कामगारांची ने आण करण्यासाठी बसगाड्या तसेच जीपगाड्यांची संख्याही मोठी असल्याने खराब रस्त्याचा फटका कामगारांना बसतो.

या मार्गावरून वाहने नेल्यावर पंक्चर होण्याबरोबर नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असल्याने वाहनचालक वैतागले आहेत. औद्योगिक वसाहत महामंडळाने या रस्त्यांची त्वरित दुरुस्तीकाम हाती घेऊन वाहनचालक तसेच कामगारांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT