Kriti Sanon In IFFI X
गोवा

Kriti Sanon In IFFI: 'चित्रपटात महिलांचे खरे रूप दाखवणे...'; अभिनेत्री क्रिती सेनॉनने पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल मांडले मत

IFFI 2024: आपण जेव्‍हा खूप कष्‍ट घेतो, मेहनत घेतो आणि तरीसुद्धा यश मिळत नाही तेव्‍हा मन खूप दुखावते. परंतु अपयश आले तरी तो एक अनुभव समजून पुढे जाणे गरजेचे असते. नेहमीच सकारात्‍मक दृष्‍टिकोन ठेवा, असा संदेश प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन हिने दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Kriti Sanon At IFFI 2024

पणजी: आपण जेव्‍हा खूप कष्‍ट घेतो, मेहनत घेतो आणि तरीसुद्धा यश मिळत नाही तेव्‍हा मन खूप दुखावते. परंतु अपयश आले तरी तो एक अनुभव समजून पुढे जाणे गरजेचे असते. नेहमीच सकारात्‍मक दृष्‍टिकोन ठेवा, असा संदेश प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन हिने दिला.

खूप मेहनत घेऊनसुद्धा एखादा चित्रपट हिट ठरेल हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळेच आपण त्‍याबाबत विचार न करता आपले काम उत्तमोत्तम करत रहावे. महत्त्वाचे म्हणजे आपण केलेला प्रयत्न आणि त्यातून शिकलेले धडे आपल्याला घडवतात. माझ्याही कारकिर्दीत उतार-चढाव आलेला आहे. पण तो तात्पुरता असतो. या दोन्ही परिस्थितीकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे, असा सल्ला क्रिती सेनन हिने दिला.

चित्रपटसृष्टीतील महिलांच्या भूमिकांवर क्रितीने प्रकाश टाकला. कारकिर्दीतील उतार-चढाव आणि यश-अपयशाबद्दलही ती मनमोकळेपणे बोलली. अपयश आले तर खचून न जाता त्यातून शिकावे, या विचारांना महत्त्‍व देण्याचे आवाहन तिने केले.

चित्रपटात महिलांचे खरे रूप दाखवणे खूप महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या काळात महिलांचे चित्रण पुरुषप्रधान दृष्टिकोनातून केले जायचे. त्यामुळे सध्याच्या काळातील महिला दुखावल्या जाऊ शकतात, रागावू शकतात आणि काहीही करू शकतात. त्यामुळे मला वाटते की महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने चित्रपटात दाखवायला हवे. महिला एकट्या हा बदल घडवू शकत नाहीत. पुरुषांचा आधारही महत्त्वाचा आहे. पुरुषांचे प्रगतिशील विचार महिलांना समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. पुरुष आणि स्त्री यांच्यातील भेदभाव बाजूला सारून मानवतेच्या दृष्टीने चित्रपटात विचार करणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन हिने सांगितले.

काळ बदलत असल्याने महिला स्वतःला अधिक महत्त्व देऊ लागल्या आहेत. अनेक महिला वेगवेगळी कामे करत आहेत आणि वेळेच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे जात आहेत. माधुरी दीक्षित, करिना कपूर, विद्या बालन, काजोल इत्यादी महिलांनी मला प्रेरणा दिली आहे, असेही सेनन म्हणाली.

‘मिमी’मुळेच माझी कारकीर्द

‘मिमी’ हा चित्रपट माझ्या कारकिर्दीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यावेळी हा धाडसी निर्णय मी घेतला होता. अनेकांनी मला या चित्रपटात आईच्या भूमिकेबद्दल पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता, पण प्रेक्षकांनी कथा भावनिकदृष्ट्या स्वीकारली आणि त्यातूनच मला अधिक आव्हानात्मक भूमिका करण्याचे प्रोत्साहन मिळाले, असे क्रिती सेनन म्हणाली.

अन् मुलांना हसू आवडले

‘तेरी बातों में उलझा जिया’ या चित्रपटात रोबोटची भूमिका साकारताना मला मानव आणि यंत्रमानव या दोन्ही भूमिका सांभाळायच्या होत्या. मी कसे हसायला हवे, हे दिग्दर्शक दाखवत होते, परंतु मला ते जमतच नव्हते. एकदा शाहिद आणि मीरा चित्रपटाच्या सेटवर आल्या होत्या, तेव्हा मला अचानक ते हसू आले आणि मी हसले आणि तेच हास्य चित्रपटात दिसले जे मुलांना खूपच आवडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT