Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : कोरगावात शिवराज्याभिषेकदिन साजरा

Goa News : प्रास्ताविक देवानंद गावडे यांनी केले. सूत्रसंचालन कृष्णा पालयेकर यांनी केले. कल्पिता कलशावकर यांनी आभार मानले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

पेडणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे काम केले, त्या कामाची नोंद आजही प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे, त्यानुसार मार्गक्रमण केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले गुण आत्मसात केल्यास निश्चितच जीवनात बदल घडवून क्रांती घडेल, असे प्रतिपादन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी देऊळवाडा-कोरगाव येथे केले.

देऊळवाडा शिवाजी चौक कोरगाव येथे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपसरपंच कल्पिता कलशावकर, पंच समिल भाटलेकर, तांबोसे- मोप- उगवे सरपंच सुबोध महाले, नामदेव गावडे, कमळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गुरू प्रभू, कृष्णा पालयेकर, देवानंद गावडे, कृष्णा गावडे , माजी सरपंच पंढरी आरोलकर, संतोष पालयेकर, कल्पेश कलशावकर आदी उपस्थित होते.

आर्लेकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मियांसह स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे प्रत्येकाने त्यांचे आदर्शवत गुण घेणे गरजेचे आहे.

प्रास्ताविक देवानंद गावडे यांनी केले. सूत्रसंचालन कृष्णा पालयेकर यांनी केले. कल्पिता कलशावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT