social media viral konkani song Dainik Gomantak
गोवा

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

Viral Konkani Song Video: सध्या याच 'मणगणं' या पदार्थाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

Akshata Chhatre

viral konkani video song: गोव्यामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. या काळात घराघरांमध्ये गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे गोड पदार्थ तयार केले जातात. यामधील एक महत्त्वाचा आणि गोवेकरांचा अत्यंत आवडता पदार्थ म्हणजे 'मणगणं'. चण्याच्या डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या या पदार्थाला प्रत्येक चतुर्थीच्या नैवेद्यात मानाचे स्थान मिळते. सध्या याच 'मणगणं' या पदार्थाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 'मणगणं' खाताना, दक्षिणेतील एका लोकप्रिय गाण्याच्या चालीवर 'मणगणे खातो मणगणे' असे गात आहे. या गाण्याच्या व्हिडिओने गोमंतकीयांची मने जिंकली आहेत आणि तो सध्या जोरदार गाजतोय.

खरंतर 'कनमणी' हे गाणे मूळतः एका दक्षिण भारतीय चित्रपटातील आहे, जे रिल्सच्या दुनियेत खूप लोकप्रिय झाले आहे. अनेक जण या गाण्याच्या तालावर विविध रिल्स तयार करत आहेत. मात्र, एका गोवेकराने या गाण्याचा वेगळाच वापर करत, आपल्या आवडत्या पदार्थाला संगीताची जोड दिली आहे.

हा व्हिडीओ केवळ मनोरंजक नाही, तर तो गोव्याची संस्कृती आणि खाद्यपदार्थांवरील प्रेमही दर्शवतो. एका पारंपरिक पदार्थाला आधुनिक सोशल मीडिया ट्रेंडसोबत जोडून तयार केलेला हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Oceanman Controversy: मच्छीमारांनी काय करावे? 'ओशनमॅन'वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; प्रशासन पूर्णपणे खालावल्याचे आरोप

EV Bus Strike: पणजीच्या प्रवाशांना 'स्मार्ट शॉक', 48 इलेक्ट्रिक बसेस अचानक गायब; वेतन थकल्यामुळे बस चालकांचा संप

Chhath Puja: गोव्यात उत्तर भारतीयांची छठपूजा उत्साहात! 4 दिवसीय व्रताची सांगता; सूर्यपूजनासाठी किनाऱ्यांवर लोटला ‘जनसागर’

Goa Live News: नायबाग येथे गोळीबार: वाळू उपशाच्या वादात दोघे जखमी

‘माझे घर’ हा केवळ परप्रांतीयांची ‘व्‍होटबँक’ जपण्‍यासाठी खटाटोप! विजय, मनोज, विरेश यांचे मत; विरोधकांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT