Viral Video: मेट्रोतील 'इन्स्टा' वेड! 'बॅटमॅन' बनून रिल करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'एवढी ताकद अभ्यासात लावली असती तर...'

Funny Metro Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. कधी-कधी व्हिडिओ, रील बनवण्याचे वेड स्वत:सह इतरांनाही संकटात पाडू शकते.
Viral Metro Reel News
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Metro Reel: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. कधी-कधी व्हिडिओ, रील बनवण्याचे वेड स्वत:सह इतरांनाही संकटात पाडू शकते. होय, सध्या एक असाच धक्कादायक आणि तितकाच हास्यास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने मेट्रोच्या आत रील बनवण्याच्या नादात असा काही अजब कारनामा केला की पाहणाऱ्यांचे हसू थांबत नाहीये. या व्यक्तीने केवळ स्वतःचेच नुकसान केले नाही, तर सरकारी मालमत्तेचेही मोठे नुकसान केले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Viral Metro Reel News
Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मेट्रोमध्ये काही प्रवासी आपापल्या कामात मग्न आहेत. त्याचवेळी, एक व्यक्ती अचानक उठून येतो आणि स्टंट करायला लागतो. तो मेट्रोमध्ये वरच्या बाजूला असलेल्या रॉडला आपले पाय अडकवून चमगादडाप्रमाणे उलटा लटकतो. इथपर्यंत सर्व ठीक होते, पण पुढच्याच क्षणी एक मोठी गडबड होते. हा व्यक्ती चांगलाच धष्टपुष्ट असल्यामुळे मेट्रोच्या छतावरील पॅनल त्याचे वजन पेलू शकले नाही आणि ते उखडून खाली पडले. पॅनलसोबतच तो व्यक्तीही 'धडामकन' खाली कोसळला.

ही घटना इतकी अचानक घडली की, तिथे उपस्थित असलेले इतर प्रवासी पूर्णपणे स्तब्ध झाले. कॅमेरात कैद झालेल्या या व्हिडिओला पाहून लोक हसून हसून लोटपोट होत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर स्पष्ट दिसते की, या व्यक्तीचा उद्देश स्टंट करुन रील बनवण्याचा होता, पण त्याचे उलटे झाले. मेट्रोची छत उखडून त्याने स्वतःलाच सोशल मीडियावरील (Social Media) थट्टेचा विषय बनवले.

Viral Metro Reel News
Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर @indianmeenukhan नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. 'रील बनवण्याच्या नादात लोक काय काय करतात... याने तर मेट्रोची छतच पाडली,' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या व्हिडिओवर लोक विविध मजेदार कमेंट्स देत आहेत.

  • एका यूजरने लिहिले, 'या भावाला वाटले की मेट्रो जिम आहे, इथे पुल-अप्स मारुन दाखवू.'

  • दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली, 'एवढी ताकद जर अभ्यासात लावली असती तर आज आयएएस झाला असता.'

  • तर, एका यूजरने गंमतीने लिहिले, 'आता मेट्रोवाले पुढील वेळी तिकिटासोबत सिक्युरिटी डिपॉझिट पण घेतील.'

Viral Metro Reel News
Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

दरम्यान, या सर्व मजेदार प्रतिक्रियांमध्ये काही वापरकर्त्यांनी मात्र या प्रकाराला धोकादायक म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे स्टंट केवळ सरकारी मालमत्तेचे नुकसान करत नाहीत, तर यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. हे वेड एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि स्वतःला व इतरांना धोक्यात घालणे हे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही काहींनी म्हटले.

एकंदरीत सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हव्यासातून लोक अनेकदा धोकादायक गोष्टी करत आहेत. या घटनेने हेच सिद्ध केले की, रील बनवण्याचे वेड अनेकदा महागात पडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com