Konkan Railways Train Schedule Dainik Gomantak
गोवा

Konkan Railways Train Schedule : ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकणकन्या रखडली; कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक

दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर थांबली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात गुरुवारी रात्री रत्नागिरीजवळ असलेल्या वीर स्टेशनवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक मात्र कोलमडलं आहे. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर थांबली होती. सिंगल ट्रॅकमुळे दोन्ही बाजूंना कोकण रेल्वे मार्गावर सर्वच गाड्यांचं वेळापत्रक मात्र यामुळे बिघडलं. मडगावहून मुंबईच्या दिशेने जाताना कोकणकन्या रखडल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.

सुमारे 5 तासांनंतर कोकणकन्या मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र कोकण रेल्वेचं वेळापत्रक मात्र अजूनही रुळावर आलेलं नाही. कोकणकन्या उशिराने मुंबईत पोहोचल्यामुळे सकाळी सीएसएमटीवरुन मडगावसाठी निघणारी मांडवी एक्स्प्रेसही उशिराने सोडण्यात आली. कोकणकन्या मुंबईत पोहोचल्यावर तीच मांडवी एक्स्प्रेस म्हणून माघारी फिरते. मांडवीसोबतच कोकण रेल्वेमार्गावरील बाकी रेल्वेगाड्याही उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी मात्र वेगवेगळ्या स्टेशनवर खोळंबल्याचं चित्र आहे.

बिघाड दुरुस्त झाल्यानंतर अजूनही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानेच सुरु आहे. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईच्या दिशेने जाणारी कोकणकन्या, तसंच मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणारी कोकणकन्या, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, मुंबई मंगळुरु मंगलोर एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस अशा अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक यामुळे कोलमडलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

EPFO PF Withdrawal: खुशखबर! PF मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

SCROLL FOR NEXT