पणजी: कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे मंडळाने मंजूर केलेल्या डब्यांपेक्षा सध्या कमी डब्यांच्या गाड्या सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे दोन महिने अगोदर आरक्षण करण्याच्या प्रयत्न करूनसुद्धा तिकीट मिळणे कठीण झाले आहे. ही प्रवाशांची मोठी फसवणूकच म्हणावी लागेल.
नव्या नियमानुसार प्रवाशांची यादी २४ तास आधीच तयार केली जाते. तसेच प्रतीक्षा यादीवर असलेले प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. यापूर्वी जागा रिक्त असल्यास तिकीट तपासनीस प्रतीक्षा यादीवरील तिकीट पक्के करू शकत होता.
ती सुविधा आता काढून घेण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः सण, सुट्ट्यांच्या काळात आणि शनिवारी-रविवारी प्रवास करणाऱ्यांसाठी आरक्षित तिकिटे मिळवणे दुरापास्त झाले आहे.
पूर्वी प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना काही प्रमाणात डब्यांमध्ये प्रवेश दिला जात असे. मात्र, आता आरक्षित तिकीट नसल्यास रेल्वेत चढण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे अनेकांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागत आहे किंवा खासगी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई, पुणे, मंगळूर, गोवा आणि केरळकडे मोठ्या प्रमाणावर कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविक प्रवास करत असतात.
गाडी | मंजूर झालेले डबे | सध्याचे डबे
वंदे भारत २० ०८
मुंबई-मंगळूर एक्सप्रेस २२ १६
तिरुनेलवेली दादर एक्सप्रेस २२ १५
तेजस एक्सप्रेस २२ १६
जनशताब्दी एक्सप्रेस २२ १६
मडगाव वांद्रे एक्सप्रेस २२ २०
पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस २२ २०
गरीब रथ २२ २१
तुतारी एक्सप्रेस २४ १९
सावंतवाडी दिवा एक्सप्रेस २२ १६
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.