savio coutinho goa Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वे भरतीसाठी मुदतवाढ! शेवट तारीख २१ ऑक्टोबर; गोमंतकीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन

Konkan Railway Corporation: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये १७० विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. अर्जाची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर होती. मात्र गोमंतकीय इच्छुक युवकांना अर्ज करता यावेत म्हणून खासदार फर्नांडिस यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व मुदत २१ ऑक्टोबर पर्यंत वाढवली.

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway Corporation Recruitment

सासष्टी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये १७० विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. अर्जाची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर होती. मात्र गोमंतकीय इच्छुक युवकांना अर्ज करता यावेत, म्हणून दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली व आता अर्ज भरण्याची मुदत वाढवून २१ ऑक्टोबर पर्यंत वाढवली असून गोमंतकीय युवकांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन कॉंग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांनी आज मडगावात पत्रकार परिषदेत सांगितले.

कोकण रेल्वेसाठी ज्या लोकांनी आपल्या जागा दिल्या त्यांच्या कुटुंबियांना नोकरी किंवा कोकण रेल्वेतील व्यवसायिक परिसर देण्याची मागणी करण्यात आली होती. खासदाराने नंतर त्याच पाठपुरावा केला.

राज्य सरकारकडे गोमंतकीय युवकांना देण्यासाठी नोकऱ्या नाहीत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री, इतर मंत्री व आमदारांनी कोकण रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करण्याची जागृती गोमंतकीय युवकांमध्ये करावी, असे आवाहनही कुतिन्हो यांनी या वेळी केले.

कोकण रेल्वेसाठी जागा देणाऱ्यांसाठी नोकरी व व्यावसायिक परिसर देण्याचे प्राधान्य आहे. मात्र, आता जेव्हा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा कळले की, कोकण रेल्वेच्या जागेला व्यावसायिक रुप देण्यासाठी एका खासगी एजन्सीकडे काम सोपवले असून हे काम पूर्ण झाल्यावर त्यातील दुकाने देण्याचे अधिकारही त्याच एजन्सीला देण्यात आल्याचे कळले. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असलेल्या आमदार कामत यांना हे माहीत असावे. मग ते गप्प का,

जर गोमंतकीयांना रोजगार मिळाला नाही तर हा प्रश्न खासदार कॅप्टन फर्नांडिस संसदेत उपस्थित करतील, असेही सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT