Konkan Railway Recruitment Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेच्या नावाखाली 'भामट्यांचा' सुळसुळाट; नोकरीच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका, रेल्वे प्रशासनाचे आवाहन!

Konkan Railway job scam alert 2026: कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देत पैशांची मागणी करून नोकरीसाठी इच्छूक असलेल्याची दिशाभूल करत असल्याची बाब कोकण रेल्वेच्या निदर्शनास आली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Fake Konkan Railway Jobs : काही घटक कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देत पैशांची मागणी करून नोकरीसाठी इच्छूक असलेल्याची दिशाभूल करत असल्याची बाब कोकण रेल्वेच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला सतर्कतेचे आवाहन केले आहे.

कोकण रेल्वेने (Konkan Railway) स्पष्ट केले आहे की, संस्थेने कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा खासगी एजन्सीला त्यांच्या वतीने पैसे गोळा करण्याचा, रोजगार देण्याचा किंवा नोकरीसंदर्भात कोणतेही आश्वासन देण्याचा अधिकार दिलेला नाही. कोकण रेल्वेमधील सर्व भरती प्रक्रिया केवळ अधिकृत माध्यमांद्वारे आणि शासनाने निश्चित केलेल्या नियम व प्रक्रियेनुसारच पार पाडली जाते.

नोकरीची हमी देण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये तसेच त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करू नयेत, असा सक्त इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या दाव्यांचा कोकण रेल्वेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नोकरी इच्छुकांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://konkanrailway.com/) तसेच इतर अधिकृत सरकारी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिराती व अद्ययावत माहितीलाच ग्राह्य धरावे, असा सल्ला देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या फसव्या कारवायांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कळवावी, जेणेकरून इतर नागरिक अशा घोटाळ्यांना बळी पडणार नाहीत, असेही कोकण रेल्वेने आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT