Konkan Railway
Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: मान्सूनपूर्व कामासाठी कोकण रेल्वे सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

मान्सूनपूर्व कामासाठी कोंकण रेल्वे सज्ज झाले आहे. वेगवेगळी पावसापूर्वीची कामे रेल्वेने सुरू केली. लोकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता कोंकण रेल्वेने गेल्या वर्षी २२ कोटींची कामे पूर्ण केली, अशी माहिती कोंकण रेल्वेचे अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ वर्षांत कोकण रेल्वे मार्गावर एकही अशी भीषण अपघाताची घटना घडली नाही.

कोंकण रेल्वेने जागोजागी रेल्वेमार्गावर जिथे दरड कोसळण्याची किवा डोंगराळ भागावरील माती पावसात रेल्वे रुळावर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणावर डोंगर कापणी करून सपाटीकरण केल्याने हे शक्य झाले.

मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती देताना घाटगे म्हणाले की, मे महिन्यात कोंकण रेल्वे रुळानजीकची गटारे साफ करून घेतात. असे केल्याने पावसाचे पाणी तुंबून राहत नाही आणि प्रवाशांनादेखील प्लॅटफॉर्मवरती येण्यास सुलभ होते.

कोंकण रेल्वे रुळावर काही ठिकाणी आम्ही अजून आमचा सुरक्षारक्षक ठेवतो तेही दक्षता म्हणून. तो तिथल्या घडामोडी स्थानिक कार्यालयात पोचवतो.

पावसाळ्यात आमच्याजवळ जास्त ताकदीची क्रेनही तयार ठेवतो. जर दरड कोसळल्यास किंवा काही मोठी घटना घडल्यास उपयोगाला येते.

सुरक्षा विषयावर लक्ष केंद्रित

कोंकण रेल्वेच्या सुरक्षा विषयावर सांगताना घाटगे म्हणाले की, गेल्यावर्षीच त्यांनी सुमारे २२ कोटीची कामे केलीत. त्यात संरक्षक भिंती बांधणे, डोंगर कापणी अशा विविध कामांचा समावेश आहे.

कोंकण रेल्वेजवळ अपघात सहायता वाहन आणि अपघातमुक्त क्रेनचा पण समावेश आहे, ज्या आपत्काळात वापरल्या जातात. अशा दोन क्रेन रत्नागिरी आणि वेर्णाला आहेत. वरील बहुतेक मॉन्सूनपूर्वची कामे ही कोंकण रेल्वेचे कामगाराच करत असतात अशी माहिती घाटगे यांनी पुढे दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Top News: मोदींना लोकोत्सवाचे निमंत्रण, आसगाव घर मोडतोड प्रकरण; राज्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT