Konkan Railway Current Update
मडगाव : मडगाव रेल्वे स्थानकाजवळील किरकोळ आगीमुळे प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. मडगाव रेल्वे यार्डजवळ अज्ञात व्यक्तीने आग पेटवली, या आगीचा भडका उडाला आणि रेल्वेच्या कम्यूनिकेशन सिस्टम म्हणजेच संदेशवहन प्रणालीचे नुकसान झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी यामुळे रेल्वेगाड्या तब्बल चार तास विलंबाने धावत आहेत.
मडगाव रेल्वे स्थानक हे गोव्यातील महत्वाचं रेल्वे स्थानक मानलं जातं. उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम भागांना गोव्यासह जोडण्यात मडगाव स्थानकाचा मोठा वाटा असतो, मात्र गुरुवारी (९ जानेवारी) रोजी अचानक घडलेल्या हा प्रसंगामुळे रेल्वेचा प्रवास थांबला आणि प्रवाशांचा खोळंबा झाला.
स्थानकाच्या बाहेर नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण शेकोटी सारख्या प्रकारामुळे हा प्रसंग ओढवला असण्याची शक्यता आहे.
ही बातमी अपडेट होत आहे...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.