Margao Railway Station: Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station: मडगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी बॅटरी ऑपरेटेड कार सेवेचा प्रारंभ

कोकण रेल्वेने केली सुविधा उपलब्ध

Akshay Nirmale

Margao Railway Station: कोकण रेल्वेतर्फे मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी बॅटरी ऑपरेटेड कार सुविधा सुरू करण्यात आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ऑपरेशन्स अँड कमर्शियल संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला.

प्रवाशांना प्लॅटफॉमवरून आपल्या बोगीपर्यंत आरामात जाता यावे, या उद्देशाने प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल. त्यासाठी 9561612135 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. या सेवेसाठी प्रतीव्यक्ती ५० रूपये शुल्क आहे. डिजिटल पेमेंट करण्याचीही सोय येथे उपलब्ध आहे.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती, आजारी व्यक्ती यांना या सेवेत प्राधान्य दिले जाईल. तथापि, या सेवेसाठी अॅडव्हान्स बुकिंग केल्यास प्राधान्य दिले जाईल. अॅडव्हान्स बुकिंग नसेल तर पहिला येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर ही सेवा दिली जाईल.

सध्याच्या श्रावण आणि सारथी या सेवांना पुरक अशी ही बॅटरी ऑपरेटेड कार सेवा आहे. यामुळे मडगाव स्थानकातील प्रवाशांना आणखी चांगली सेवा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध केले शिथिल; जागतिक बाजाराला दिलासा

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

SCROLL FOR NEXT