कोकण रेल्वेने पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांची तयारी केलीय. यात मार्गावरील देखभाल, अतिरिक्त सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा यांवरती विशेष लक्ष देण्यात आले आहे.
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू झाले असून ते 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.
बदलणाऱ्या हवामानासोबत मार्गावरील ट्रेन्सचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्नशील आहे. पावसाळ्यात अखंडित सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे कोकण रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोकण रेल्वेने पावसाळ्यात रेल्वे मार्गावर गस्त घालण्यासाठी 672 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर वेग निर्बंध लादलेल्या असुरक्षित मार्गांवर चोवीस तास गस्त घातली जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर वेग निर्बंध लादले जातात. प्रतिकूल हवामानामुळे घडणाऱ्या नैसर्गिक घटना विचारात घेता कोकण रेल्वे सुरक्षात्मक उपाययोजना करत असते. कॅसल रॉक परिसर असेल किंवा घाट मार्गात होणाऱ्या घटनांमुळे बऱ्याचवेळा रेल्वे गाड्या रद्द होणे अथवा विलंबाने थावतात. यासाठी कोकण रेल्वेकडून खबरदारी घेतली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.