Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला वेग; पेडणे-जुनेगोवे येथे नवे बोगदे, रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर

Konkan Railway Doubling project: कोकण रेल्वे लोहमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी पेडणे आणि जुनेगोवे येथे नव्याने बोगदे खोदण्यात येणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कोकण रेल्वे लोहमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी पेडणे आणि जुनेगोवे येथे नव्याने बोगदे खोदण्यात येणार आहेत. या कामासाठी रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली.

ते म्हणाले, लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे इंधनावरील वार्षिक १९० कोटी रुपयांची बचत होत आहे. आता लोहमार्ग दुपदरी करण्यासाठी मंगळूरहून गोव्यापर्यंत आणि गोवा ते वैभववाडीपर्यंतच्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यानंतर प्रकल्प अहवाल तयार करून त्याला मंत्रालयाची मंजुरी घेण्यात येणार आहे. पेडणे व जुनेगोवे येथे बोगदे त्यासाठी बांधावे लागतील. त्याकामासाठी आधीच रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे.

कोलाड ते सुरतकल या मार्गावर ट्रक वाहून नेणारी रोरो सेवा चालवली जाते. आता ऑक्टोबरपासून मासिक १२ फेऱ्यांऐवजी ४६ फेऱ्या या सेवेच्या असतील. त्याशिवाय ५७ टनी ट्रक वाहून नेण्यात येतील, अशी माहिती देऊन ते म्हणाले, कोकण रेल्वेने महसूल वाढीवर भर दिला आहे. त्यासाठी २३ हजार ५०० कोटी रुपयांची कामे मिळवण्यात आली आहेत.

बोगदे खोदणे, लोहमार्गांचे विद्युतीकरण करणे, पूल बांधणे आदी कामांत कोकण रेल्वेने निपुणता मिळवली आहे. त्याआधारे ही कामे मिळवली आहेत. देशातील काही भागांतील लोहमार्गांच्या विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वेला मिळाले आहे. येत्या सहा महिन्यांत अशी १५ हजार कोटी रुपयांची कामे आणखीन मिळतील असे सांगून ते म्हणाले, कॉंगो येथील मेट्रोचे काम लवकरच सुरु केले जाईल. दुबई मेट्रोच्या निविदा प्रक्रियेत सहभाग आहे.

८५०० कोटींची कामे!

देशभरात रेल्वे बांधकामाची ८५०० कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. प्रवासी सुविधा वाढीवर यंदा २१ कोटी रुपये खर्च केले जातील, तीन वर्षात ४५ कोटी रुपये खर्च केले. पाच वर्षांनी कोकण रेल्वे मार्गांवर दररोज १०० हून अधिक गाड्या धावतील असे नियोजन आहे.

आज कोकण रेल्वे कर्जमुक्त

कोकण रेल्वेने प्रकल्पासाठी रोखे बाजारातून घेतलेले कर्जाची परतफेड करण्यात येत असून उद्या २२ सप्टेंबर रोजी शेवटचे ३०० कोटी रुपये फेडले जातील असे झा यांनी सांगितले. कोविडची दोन वर्षे वगळता कोकण रेल्वे नफ्यात असून गेल्या तीन वर्षात ३२३, १३८ व १९९ कोटी रुपये अनुक्रमे नफा झाला आहे. पाच वर्षांनी नफ्याचे प्रमाण वार्षिक ३०० कोटी रुपये असेल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russia Nuclear Satellite: अवकाशात अण्वस्त्रसज्ज उपग्रह पाठवण्याच्या तयारीत रशिया? जर्मनीच्या गुप्तचर रिपोर्टने खळबळ; नाटो देशांची वाढली धाकधूक

Shirgaon Mining Impact: खाणकामातून हजारो कोटींची कमाई, पण गावाचे पाणी, शेती अन् रोजगार संकटात

VIDEO: प्रियांश आर्यचा 'रुद्रावतार'! 266 च्या स्ट्राइक रेटने गोलंदाजांची धुलाई; 19 षटकार आणि 7 चौकारांसह कुटल्या 181 धावा

Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

Bangladesh Violence: बांगलादेशात राजकीय संघर्ष शिगेला! शेख हसीना यांच्या समर्थकांच्या रॅलीवर हल्ला; गोपालगंजमध्ये जाळपोळ आणि तोडफोड VIDEO

SCROLL FOR NEXT