Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील 23 गाड्या रद्द, मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

रेल्वे गाड्या रद्द आणि गाडीच्या वेळेत बदल करण्यात आल्याने मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Pramod Yadav

Konkan Railway: पनवेल-कळंबोली मार्गावर मालगाडीचे पाच डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 10 गाड्या अंशत: रद्द तर, 3 गाड्यांच्या मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच, चार गाड्यांच्या वेळांत बदल करण्यात आला आहे.

रेल्वे गाड्या रद्द आणि गाडीच्या वेळेत बदल करण्यात आल्याने मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रात्रभर प्रवाशी स्थानकावर खोळंबले होते.

पनवेल-कळंबोली मार्गावर मालगाडीचे पाच डबे घसरल्यामुळे 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरच्या एकूण 12 गाड्या रद्द करण्यात आल्या. यात पनवेल कुडाळ, कुडाळ पुणे, मडगाव ते लो. टीळक टर्मिनस, मंगळुरु लो. टीळक टर्मिनस या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. तर, काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या.

याचा फटका प्रवाशांना बसला व मडगाव स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी पाहायला मिळाली. गाड्या रद्द आणि काही गाड्यांच्या वेळेत बदल केल्याने प्रवासी रेल्वे स्थानकावर खोळंबून पडले होते. स्थानकावर मिळेल त्या जागी काहीजण थांबून पर्यायी रेल्वेची वाट पाहत होते.

दरम्यान, रविवारी सायंकाळी 7.30 नंतर मार्गावरील दोन्ही लाईन सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. वाहतूक हळुहळू सुरळीत होत आहे.

मडगाव स्थानकावर खोळंबलेल्या प्रवाशांनी पर्यायी बस तसेच इतर वाहतूक मार्गाची सोय केली. तर, अनेकांना रेल्वे शिवाय पर्याय नसल्याने रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत स्थानकावर ताटकळत थांबावे लागले. सकाळी काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

SCROLL FOR NEXT