Konkan Marathi Council Dainik Gomantak
गोवा

Konkan Marathi Council : विष्णू वाघ हे साहित्यिकांचे दीपस्तंभ

नारायण राठवड : 59 व्या जयंतीनिमित्त ‘कोमप’तर्फे म्हापशात आदरांजली

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Marathi Council : विष्णू वाघ हे गोव्यातील साहित्यिकांसाठी साक्षात दीपस्तंभ होते. त्यांच्या धीरगंभीर वाणीतून साहित्यसरितेचा ओघ सदैव प्रवाहित असायचा.

उत्तम बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी गोव्याबरोबरच महाराष्ट्रातही नावलौकिक संपादन केला होता, असे उद्‍गार योगशिक्षक नारायण राठवड यांनी काढले.

‘कोकण मराठी परिषद, गोवा’तर्फे म्हापसा येथील मुख्यालय सभागृहात आयोजित ‘कै. विष्णू सूर्या वाघ जयंती’ कार्यक्रमात त्यांना आदरांजली व्यक्त करून प्रमुख वक्ता या नात्याने श्री. राठवड बोलत होते.

वाघ यांच्या ५९व्या जयंतीनिमित्त ‘कोमप’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेच्या कार्यवाह अक्षता किनळेकर, कवी शिवानंद साळगावकर, पत्रकार श्रीराम च्यारी व सुदेश धारगळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सुदेश तिवरेकर यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सूत्रसंचालन कोमपच्या कार्यवाह अक्षता किनळेकर यांनी केले. शांतिमंत्राचे गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विष्णू वाघ यांचे बंधू प्रा. रामराव वाघ यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सुदेश आर्लेकर यांनी आभारप्रकटनाच्या वेळी स्पष्ट केले.

विष्णू वाघ यांच्या समग्र साहित्यावर कोमपतर्फे अलीकडेच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रामधील शोधनिबंधांचे पुस्तक येत्या दोन-तीन महिन्यांत प्रकाशित केले जाईल, असेही श्री. आर्लेकर यांनी नमूद केले.

पत्रकार, लेखकाबरोबर ते व्यंग्यचित्रकार...

राठवड पुढे म्हणाले, वाघ यांच्या रोखठोक बोलण्यात खोटारडेपणा कदापि नव्हता. उत्तम दर्जाचा कवी, लेखक, पत्रकार, नाट्यलेखक, व्यंग्यचित्रकार म्हणून ते गोमंतकीय जनमानसात सर्वपरिचित होते.

अध्यात्माचा अभ्यास करताना ते चुकून राजकारणात सक्रिय झाले. स्वत:च्या अमोघ वाणीद्वारे व लेखणीतून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले, ती एक महान व्यक्ती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suleman Khan: कोठडीतून पलायन प्रकरण! कॉन्स्टेबलसहित सुलेमान खानवर आरोप निश्चित

Goa News: ‘त्या’ निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन द्या! फौजदारी खटलाप्रकरणी गोवा खंडपीठाचा आदेश

Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

Mhaje Ghar: गोमंतकीयांना परवडणारे ‘माझे घर’ देणार! CM सावंतांचे आश्वासन; ‘गृहनिर्माण’कडून आराखड्याचे काम सुरू

Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

SCROLL FOR NEXT