Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News : कोमरपंत समाज संस्था वास्कोचा कार्यक्रम उत्साहात

Vasco News : मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, क्षत्रिय कोमरपंत समाज संस्थेच्या वास्को विभागाचा वार्षिक कार्यक्रम वरुणापुरी येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

यानिमित्त सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, श्री सत्य साई सेवा समितीतर्फे भजन, महाप्रसाद, मुलांसाठी चित्रकला, नृत्य व वेषभूषा स्पर्धा व महिलांसाठी रांगोळी व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई क्षत्रिय कोमरपंत समाजाचे उपाध्यक्ष उदय नाईक, खास अतिथी म्हणून सांकवाळचे उपसरपंच गिरीश पिल्ले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी समाज संस्थेचे अध्यक्ष सुभाष माजाळीकर, वास्को विभागाच्या अध्यक्ष सुनीता नाईक, महिला अध्यक्ष रेश्मा नाईक, सचिव राजाराम नाईक, खजिनदार अरुण नाईक व कार्यक्रम संचालक श्यामराव नाईक उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे उदय नाईक व खास अतिथी गिरीश पिल्ले यांची यावेळी भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, वेषभूषा, नृत्य, रांगोळी व पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. समाजाच्या अध्यक्षांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

सुनीता नाईक यांनी स्वागत केले. विद्या कोमरपंत व खुशी नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन रोजा नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT