Kolamba Lake Goa Dainik Gomantak
गोवा

Kolamba Lake: कमळांसाठी प्रसिद्ध ‘कोळम’ तळ्याचा बांध फोडला, चढणीचे मासे पकडायला आबालवृद्धांची गर्दी

Kolamba Lake Karapur: कारापूर येथील नैसर्गिक ‘कोळम’ तळ्याचा बांध रविवारी फोडून पाण्याला वाट मोकळी करून देण्‍यात आली. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा बांध घालून पाणी अडवण्यात येते.

Sameer Panditrao

डिचोली: कारापूर येथील नैसर्गिक ‘कोळम’ तळ्याचा बांध रविवारी फोडून पाण्याला वाट मोकळी करून देण्‍यात आली. मोसमी पावसाची चाहूल लागताच दरवर्षी भरलोकवस्तीजवळ असलेल्या या तळ्याचा बांध फोडण्यात येतो.

बांध फोडताना यंदाही तळ्यातील चढणीचे गोडे मासे पकडण्यासाठी मुलां-बाळांसह मत्स्यखवय्यांनी गर्दी केली होती. दुपारपर्यंत तर ती आणखी वाढली. कारापूर येथील कोळमवाड्यावर भरलोकवस्तीला टेकूनच मोठे नैसर्गिक तळे आहे.

लाल कमळांसाठी प्रसिद्ध असलेल्या या तळ्यातील पाण्यावर स्थानिक लोक शेती, बागायती पिके घेतात. दरवर्षी पावसाळा जवळ आला की पावसाळ्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साधारण जून महिन्याच्या सुरवातीस या तळ्याचा बांध फोडून पाणी आणि गाळ बाहेर सोडतात. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा बांध घालून पाणी अडवण्यात येते.

गोड्या माशांची मोठी पैदास

कोळम तळ्यात दरवर्षी गोड्या माशांची पैदास होत असते. तळ्यातील बांध फोडून पाणी आटले की गोडे मासे आयते पकडता येतात. यंदाही या तळ्यातील मासे पकडण्यासाठी कारापूरसह जवळपासच्या भागातील मत्स्यखवय्यांनी गर्दी केली होती. मुलां-बाळांसह महिलांही तळ्यात मासे पकडताना दिसून येत होत्या.

तळ्‍यात मगरींचे दर्शन

गेल्या काही वर्षांपासून ‘कोळम’ तळ्यात मगरींचा संचार दिसून येत आहे. सात वर्षांपूर्वी तळ्यात मासे पकडताना स्थानिक युवकांनी एक मगरही पकडली होती. आजही तळ्यात दोन मगरी आढळून आल्या. तळ्यातील पाणी आटताच आणि तळ्यात गर्दी होताच दोन मगरी पाण्याबाहेर आल्या. मात्र या मगरींनी कोणावरही हल्ला केला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT