Kokedama Plant Lekhni Naik  Dainik Gomantak
गोवा

Kokedama: गोवा ग्रीन करण्यासाठी झटणारी 'लेखणी', जपानी 'कोकेडमा' तंत्र

Kokedama Plant Lekhni Naik: घरातील छोट्या रोपांना प्लास्टीकपासून दूर ठेवणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांची निगा राखाणे या दृष्टीने जपानी ‘कोकेडमा’ तंत्रज्ञान सध्या लोकप्रिय होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

घरातील छोट्या रोपांना प्लास्टीकपासून दूर ठेवणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांची निगा राखाणे या दृष्टीने जपानी ‘कोकेडमा’ तंत्रज्ञान सध्या लोकप्रिय होत आहे. बहुतेक घरांत झाडे प्लास्टीकच्या कुंड्यांमध्ये किंवा पिशव्यांमध्ये वाढताना आढळतात; मात्र प्लास्टीक पर्यारणासाठी हानिकारक असल्याचे आज सारे जाणतात.

‘या प्लास्टीकला पर्याय म्हणून ‘कोकेडमा’ ही नैसर्गिक व जैविक पद्धत वापरल्यास प्लास्टीकमुक्त हरितक्रांती साधता येऊ शकते’, असे साखळी येथील कोकेडमा आर्टिस्ट लेखणी नाईक म्हणतात.

कला अकादमी येथे क्रीडा खात्यातर्फे सुरू असलेल्या युवा महोत्सवात लेखणीने उभारलेल्या स्टॉलला विशेष प्रतिसाद मिळताना दिसतो. ‘होम ग्रोन प्लांट्स’ या आपल्या इन्स्टाग्राम पेजद्वारे लेखणी पर्यावरणपूरक बागकामाचा संदेश व्यापकपणे पोचवत असते. या तंत्रज्ञानाची माहिती अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचावी, हा तिचा उद्देश आहे.

लेखणी म्हणते, ’कोकेडमा तंत्र गोव्यात रुजावे यासाठी मी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे जागृती करत आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांमधील महिलांना मी प्रशिक्षण देत असून त्यांचा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. जर प्रत्येकाने हे तंत्र स्वीकारले, तर घरांमधील प्लास्टीकचा वापर निश्चितच कमी होऊ शकतो.”

राज्यस्तरीय पुरस्कार

लेखणीला दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्कार लाभला आहे आणि 2024 च्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तिने गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सुंदर आणि विघटनशील कोकेडामा तयार करण्यासाठी शेवाळ्याच्या जागी नारळाच्या काथ्याचा प्रयोग करून तिने तिची सर्जनशीलताही सिद्ध केली आहे. तिचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग नक्कीच प्रेरणा देणारा आहे.

कार्यशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद

रोपांवरच्या प्रेमातून लेखणीचा प्रवास सुरू झाला. रोपटी आपल्याला समजू घेऊ शकतात, असे तिला लहानपणी वाटायचे आणि मग हा बंध हळूहळू अधिकच मजबूत होत गेला. स्थानिक औषधी आणि जंगलातील वेगवेगळ्या वनस्पती गोळा करण्याचा छंद विकसित करता करता पर्यावरण-सजग बागकामाला प्रोत्साहन देणे हे तिचे आजीवन मिशन बनले. घरगुती रोपट्यांचा तिचा वैयक्तिक संग्रह आता एक राज्य पुरस्कारप्राप्त बगीचा बनून बहरला आहे. ती राज्यात अनेक ठिकाणी ‘कोकेडमा’ च्या कार्यशाळा आयोजित करीत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ग्राहकाने वीज खात्‍याला तब्बल 250 कोटींना थकवले! 319.74 कोटींची बिले अजूनही थकित; वीजमंत्र्यांनी दिली माहिती

Goa Assembly: खासगी विधेयकांवरून विरोधकांचा गदारोळ! कामकाजावर घातला बहिष्‍कार; सभापतींकडून दोनदा सभागृह तहकूब

Panaji Municipal Election: विजयोत्सवाने राजधानी दुमदुमली! सलग 7 तास मिरवणूक; बाबूश पॅनेलवर शुभेच्छांचा वर्षाव VIDEO

Rashi Bhavishya: पैसा खुळखुळणार! 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, बाकीच्यांचे काय? वाचा संपूर्ण राशिभविष्य..

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT