Romi Konkani Dainik Gomantak
गोवा

Romi Konkani: रोमी कोकणी भाषेच्या विधेयकाला पाठिंबा नको! आमदारांना कोकणी भाषा मंडळाचे आवाहन

Konkani language board appeal: कोकणी भाषा मंडळ आणि अखिल भारतीय कोकणी परिषद यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना शिक्षणात रोमी कोकणी भाषेचा वापर करण्याची मागणी करणाऱ्या कोणत्याही विधेयकाला/ठरावाला पाठिंबा न देण्याचं आवाहन केलं आहे.

Sameer Amunekar

पणजी: कोकणी भाषा मंडळ आणि अखिल भारतीय कोकणी परिषद यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना शिक्षणात रोमी कोकणी भाषेचा वापर करण्याची मागणी करणाऱ्या कोणत्याही विधेयकाला/ठरावाला पाठिंबा देऊ नये, असे आवाहन केले आहे.

जारी केलेल्या एका पत्रकात मंडळाची अध्यक्ष रत्नमाला दिवकर आणि परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष चेतन आचार्य यांनी या मुद्द्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांना आवाहन केले आहे, की त्यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याच्या प्रयत्नापासून दूर रहावे.

गोव्यामध्ये १९७० च्या दशकात शिक्षणात देवनागरी लिपीतील कोकणी भाषा सुरू झाली होती. त्यामुळे मुलांच्या भवितव्याशी सांप्रदायिक आधारावर विभाजन करून खेळू नका, असेही आवाहन त्यांनी पुढे केले आहे.

देवनागरी लिपीत कोकणी शिकणारे विद्यार्थी एका वर्गात आणि रोमन लिपीत कोकणी शिकणारे विद्यार्थी दुसऱ्या वर्गात असे विद्यार्थ्यांचे विभाजन झाले तर सर्वधर्म समभावाच्या घटनेतील तरतुदींनाच तिलांजली दिल्यासारखे होईल. म्हणून भारतीय राज्यघटना मानणाऱ्या प्रत्येकाने या विधेयकाचा कडाडून विरोध करावा, असे आवाहन पत्रकात पुढे केले आहे.

दरम्यान, दोन्ही संघटनांनी सरकारी पातळीवर जनमत कौल दिवस (अस्मिताय दिस) साजरा करण्याच्या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन केले आहे.

...अन्यथा राज्यव्यापी आंदोलन

रोमी कोकणी भाषेसाठी लॉबिंग करणाऱ्या काही आमदारांच्या हालचालींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत या दोन्ही संघटनांनी सरकारने असा कोणताही प्रयत्न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT