Salcete  Gomantak Digital Team
गोवा

Salcete News : पावसाळ्यातील परिस्थितीला तोंड देण्यास कोकण रेल्वे सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete News : कोकण क्षेत्रात पावसाळ्यात भयंकर पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वृक्ष पडणे, भिंती कोसळणे सारख्या घटनांना तोंड द्यावे लागते. या सर्व परिस्थितिला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर जिथे जिथे पाणी साचण्याची परिस्थिती उदभवू शकते किंवा जिथे वृक्ष मोडून पडण्याची शक्यता असते त्याचे सर्वेक्षण करुन तिथे उपाययोजना करण्याचे काम कोकण रेल्वेने हातात घेतले आहे.

गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे जी सुरक्षेची उपाययोजना केली, त्यामुळे माती किंवा दगड कोसळणे सारखे प्रकार पुष्कळ कमी झाले आहेत. गत दहा वर्षांत मोठ मोठे दगड रेल्वे मार्गावर पडण्याच्या प्रकारात घट झाली असल्याचे कोकण रेल्वेच्या डिकुन्हा लेओरा यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात मार्गदर्शकतत्वांप्रमाणे गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी 673 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

काही ठिकाणी गतीवर नियंत्रण ठेवण्याच निर्णय घेण्यात आला आहे. काही महत्वाच्या टप्प्यांवर बीआरएन आरोहित उत्खनन किंवा खोदकाम करणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बेलापूर, रत्नागिरी व मडगाव या ठिकाणी 24 ही तासांसाठी नियंत्रण कक्ष उघडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी गाड्यांचे वेळापत्रक 139 क्रमांक डायल करुन किंवा www.konkanrailway.com या संकेतस्थळावरुन मिळवावी, असे म्हटले आहे.

पूर इशारा यंत्रणेची व्यवस्था

मानगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवाडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ, उडपी या ठिकाणी स्वयंचलित रिकोर्डींग करणारे पर्जन्यमापकांची व्यवस्था करण्यात आली आहे. काली नदी (मानगाव ते वीर), सावित्री नदी (वीर ते सापे वामाने), वशिश्टी नदी (चिपळुण ते कामाथे) येथील पुलांसाठी पूर इशारा यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पानवाल, मांडवी व झुआरी पूल व शरावती पूलांवर आनेमोमिटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेचे निर्देश

  • प्रकाश अंधुक असेल तिथे लोको पायलटांना त्यांची गती ताशी ४० किलोमीटर एवढी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • कोकण रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन्स देण्यात आले आहेत.

  • लोको पायलट व गार्ड्सना वॉकी-टॉकी देण्यात आले आहेत. अपघात वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT