Vat Purnima Dainik Gomantak
गोवा

Vat Purnima 2023: वटपौर्णिमेनिमित्त जाणून घ्या पूजाविधी, वेळ अन् महत्व..

या पूजेच्या निमित्ताने वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करण्यासारखं आहे.

Ganeshprasad Gogate

Vat Purnima:  हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. वटपौर्णिमा हे एक व्रत असून या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षरूपी ईश्वराकडे साकडे घालतात.

याच पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने वटवृक्षाच्या खाली सत्यवानाचे प्राण परत आणले असल्याची एक पुराणकथा सांगितली जाते. या दिवसाची आठवण म्हणून विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात.

वडाला अनादि-अनंत असा अक्षय्यवट म्हटले गेले आहे. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वडाचे गुणवैशिष्ट्य म्हणजे याच्या पारंब्या जमिनीच्या दिशेने जाऊन जमिनीतून रूजून पुन्हा जन्म घेतात.

थोडक्यात वडाच्या प्रत्येक पारंबीतून नवीन वटवृक्ष जन्म घेतो. याच प्रक्रियेमुळे वडाचा विस्तार वाढत जातो आणि म्हणून त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळेच स्त्रिया त्याच्याकडे अखंड सौभाग्याचे साकडे घालतात.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठीचे साहित्य:-

ताम्हण, तांब्या, पळी- पंचपात्र व पाणी, पंचामृत, विड्याची पाने, सुपारी, सुटे पैसे, हळद कुंकू, गंध, अक्षता, कापसाचे वस्त्र, धूप, दिवा, कापूर, नैवेद्य (यासाठी या मौसमात उपलब्ध असणारी फळं, गूळ-खोबरं, वापरू शकता), धागा, फुलं, सौभाग्याचं लेणं.

वटपौर्णिमा पूजा मुहूर्त;-

पौर्णिमा प्रारंभ:- 03 जून, शनिवार, सकाळी 11:18 (पौर्णिमा सुरू झाल्यानंतर पूजेला सुरूवात करावी.)

वटपौर्णिमा पूजाविधी;-

सुचिर्भूत होऊन वडाच्या झाडाजवळ पाट किंवा आसन घेऊन बसावे. आचमन करून इष्टदेवता, कुलदेवता, उपास्यदेवता यांचे स्मरण करावे. विघ्नहर्त्या गणपतीची पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला ईश्वररूप मानून त्याची षोडशोपचार पूजा करावी.

वडाच्या झाडाला धागा गुंडाळत 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर पतीसहित घरातील सर्वांच्या आणि स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.

त्यानंतर उपस्थित सर्वांना वायन (आंबा, फणस, अननस, काजू, जांभूळ, जाम आदी फळांनी तयार केलेला द्रोण) दान करावे. तसेच वडाच्या झाडाखाली बसून व्रतकथा वाचावी. कुणी कथा वाचत असेल तर ती शांत चित्ताने ऐकावी. अशाने आपल्ये इच्छा पूर्ण होतात असा प्रघात आहे.

(प्रत्येक भागातील प्रथा-परंपरांनुसार पूजाविधीत बदल होऊ शकतो)

लग्नानंतरचं स्त्रियांनी करायचं हे पहिलंच व्रत असून हे स्त्रियांच्या सौभाग्यासाठी केलं जातं. वड हा स्रियांच्या आरोग्यासंबंधीच्या तक्रारीवर गुणकारी वृक्ष आहे. सहाजिकच घरातील स्रीचे आरोग्य चांगले राहिले तर तिच्या नवर्‍याचे आणि परिणामी सर्व घरातल्यांचे आरोग्य चांगले राहते अशी या व्रतामागची धारणा आहे.

या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करवी मात्र वडाची फांदी तोडून तिची पूजा करू नये. पूजाविधीनंतर वायन दान द्यावे.

• राजू दामोदर केळकर- म्हापसा ग्रामपुरोहित

आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.

वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी असून प्राणवायूचा मुबलक पुरवठा हे झाड करत असतं. स्त्रियांचे शरीर हे पुरूषांच्या तुलनेत संवेदनशील असून स्त्रियांचे आरोग्य उत्तम रहावे हा दूरगामी विचार या व्रतामधून दिसून येतो.

त्यामुळेच या पूजेच्या निमित्ताने वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता करण्यासारखं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT