Shivlila Patil Dainik Gomantak
गोवा

Shivlila Patil: शिवलीला पाटील यांचे गोव्यात पार पडले किर्तन; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत Video

Shivlila Patil Goa Kirtan: शिवलीला पाटील यांनी गोव्यातील किर्तनाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरुन शेअर केला आहे.

Pramod Yadav

मये: महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांचे नुकतेच गोव्यात किर्तन पार पडले. रायझिंग युथ, मये यांच्या वतीने या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवलीला यांचे स्वागत केले.

शिवलीला पाटील यांनी गोव्यातील किर्तनाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरुन शेअर केला आहे. शिवलीला त्यांच्या सहकाऱ्यांसह मयेतील किर्तनस्थळी हजेरी लावतात, यावेळी मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात. शिवलीला महाराष्ट्रात सर्वत्र किर्तनासाठी हजेरी लावत असतात.

शिवलीला यांनी किर्तनानंतर गोव्यातील निसर्गाचा आस्वाद घेतला. शिवलीला यांनी गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावरुन फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते.

Shivlila Patil Goa Kirtan

शिवलीला पाटील या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रहीवासी आहेत. त्या बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसल्या होत्या. यामुळे त्याच्यांवर टीका देखील झाली होती. वारकरी संप्रदाय नाराज झाल्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या शो मध्ये जाण्यापूर्वी किंवा असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मोठ्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

SCROLL FOR NEXT